पहिल्याच दिवशी ३0 लाखांच्या रेल्वे आरक्षण तिकिटांची विक्री

By admin | Published: April 2, 2015 01:59 AM2015-04-02T01:59:04+5:302015-04-02T01:59:04+5:30

‘वेटिंग’मुळे तिकीट वा प्रवास रद्द करण्याचे प्रमाण होणार कमी.

Sale of Railway Reservation Tickets for 30 lakhs on the very first day | पहिल्याच दिवशी ३0 लाखांच्या रेल्वे आरक्षण तिकिटांची विक्री

पहिल्याच दिवशी ३0 लाखांच्या रेल्वे आरक्षण तिकिटांची विक्री

Next

अकोला : भारतीय रेल्वे प्रशासनाने तिकीट आरक्षणाचा अवधी ६0 दिवसांवरून १२0 दिवसांवर नेण्याचा निर्णय ३१ मार्च रोजी घेतला. ही योजना १ एप्रिलपासून देशभरात एकाच वेळी कार्यान्वित झाली. यापुढे रेल्वेने प्रवासाचे बेत आखणार्‍या प्रवाशांना चार महिने अगोदर तिकीट आरक्षित करता येणार आहे. तर योजना कार्यान्वित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी अकोला रेल्वे स्थानकावर ३0 लाखांच्या रेल्वे आरक्षण तिकिटांची विक्री झाल्याची माहिती आहे.
पूर्वीच्या तुलनेत भारतीय रेल्वेचे जाळे देशात सर्वदूर पसरले आहे. पूर्वी एका ठिकाणाहून दुसर्‍या दूरच्या ठिकाणी जाताना प्रवाशांना अनेक ठिकाणी गाड्या बदलाव्या लागत होत्या. पूर्वीच्या सर्व अडचणींवर मात करीत उदयास आलेल्या अत्याधुनिक संगणकीय प्रणालीमुळे देशाच्या कानाकोपर्‍यात पसरलेल्या रेल्वे मार्गातील हे सर्व अडथळे दूर झाले. अद्ययावत सेवा-सुविधा पुरविण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय रेल्वे प्रशासन विविध बदल करीत आहेत. प्रवासाचे बेत आखणार्‍या प्रवाशांना पूर्वी ६0 दिवस अर्थात दोन महिने अगोदर रेल्वे तिकिटाचे आरक्षण करता येत होते. प्रवासाच्या दिवसापर्यंंत तिकीट कन्फर्म होण्यासाठी वाट पाहणार्‍या प्रवाशांना ह्यवेटिंगह्णमुळे एक तर अडचणीचा ठरणारा प्रवास करावा लागत होता, नाही तर तिकीट रद्द करून प्रवासाचे बेत बदलावे लागत होते. त्यातच मध्यंतरीच्या काळात तिकीट कन्फर्म नसलेल्या प्रवाशांना आरक्षित डब्यात प्रवास करता येणार नाही, असा फतवादेखील रेल्वे प्रशासनाने काढला. यामुळे पूर्णत: अडचणीत सापडलेल्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सरसकट १२0 दिवस अगोदर म्हणजे तब्बल चार महिन्यांपूर्वी रेल्वे तिकिटाचे आरक्षण करण्याची योजना १ एप्रिलपासून प्रवाशांसाठी संपूर्ण देशभरात एकाच वेळी कार्यान्वित केली. यामुळे आरक्षण तिकीट ह्यवेटिंगह्णवर असलेल्या बहुतांश प्रवाशांवर तिकीट वा प्रवास यापैकी काहीही रद्द करण्याची वेळ येणार नाही.

Web Title: Sale of Railway Reservation Tickets for 30 lakhs on the very first day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.