प्रतिबंधित निविष्ठांची विक्री; ‘एसएओं’कडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 01:46 AM2017-09-28T01:46:48+5:302017-09-28T01:46:48+5:30
अकोला : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून बियाणे, खते, कीटकनाशक विक्रीचा परवाना दिला असताना, त्या आधारे कृषी केंद्र चालवणार्या अजंता अँग्रो एजन्सीने सेंद्रिय निविष्ठांचीही बेकायदा विक्री सुरू केली आहे. या प्रकरणाची तक्रार जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकार्यांक डे करण्यात आली; मात्र त्यांनी दखल न घेतल्याने सहय़ाद्री प्रतिष्ठानच्याव तीने सोमवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. अव्वाच्या सव्वा दराने कृषी निविष्ठांची बेकायदा विक्री करणार्या या एजन्सीचा परवाना रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

कृषी विभागाने दिलेल्या परवान्यानुसार बियाणे, खते, कीटकनाशकांव्यतिरिक्त इतर कुठल्याही वस्तूंची विक्री परवान्यात नमूद ठिकाणावरून करता येत नाही. तरीही टिळक रोडवरील अजंता अँग्रो एजन्सीने काही कंपन्यांचे ह्युमिक अँसिडसह, फायटर, मोअर, इसाबियन अशा विविध साहि त्याची चढय़ा दराने विक्री सुरू केली आहे. या निविष्ठांवर प्र ितबंध असतानाही कृषी विभागाची दिशाभूल करीत सर्रास विक्री सुरू आहे. यामधून कृषी सेवा केंद्र संचालकांनी शेतकर्यांची आर्थिक पिळवणूक सुरू केली आहे.
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे तक्रार करूनही कारवाई न केल्याने तक्रारकर्त्यांनी या प्रकाराची तक्रार सोमवारी जिल्हा अधीक्षक कृ षी अधिकारी यांच्याकडे केली आहे. परवान्याच्या ठिकाणी या साहित्याची विक्री करण्यास प्रतिबंध असतानाही त्याची देयके खुलेआम त्याच परवान्याच्या नावे देण्यात येत आहेत. या गंभीर प्रकरणाची तातडीने चौकशी करून कृषी विभागाने एजन्सीचा परवाना रद्द करण्याची मागणी सह्याद्री प्र ितष्ठानचे अध्यक्ष संतोष सोनोने यांच्यासह पिंटू मोडक, रूपेश यादव, मंगेश ठाकूर, अजय ठाकूर, सागर सरोदे, चंद्रकांत झटाले, पंकज बोंडे, संजय कुचेकर, किरण पांडे, विक्रांत इंगळे व तेजस साखरकर यांनी केली आहे.