दुसऱ्याचा प्लॉट स्वत:चा भासवून केला विक्रीचा सौदा; उद्योजक विवेक पारस्कर यांच्याविरुद्ध गुन्हा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 12:57 PM2018-09-01T12:57:41+5:302018-09-01T13:01:44+5:30

अकोला : दूसºयाचा प्लॉट स्वत:चा असल्याचे भासवून परस्पर विक्री करणारे उद्योजक विवेक पारस्कर यांच्याविरू ध्द प्राप्त झालेल्या तक्रारीवरू न गुरू वारी रात्री उशिरा सिव्हिल लाइन पोलसांनी गुन्हा दाखल केला.

 The sale of the second plot itself; Crime against industrialist Vivek Paraskar | दुसऱ्याचा प्लॉट स्वत:चा भासवून केला विक्रीचा सौदा; उद्योजक विवेक पारस्कर यांच्याविरुद्ध गुन्हा 

दुसऱ्याचा प्लॉट स्वत:चा भासवून केला विक्रीचा सौदा; उद्योजक विवेक पारस्कर यांच्याविरुद्ध गुन्हा 

Next
ठळक मुद्दे विवेक पारस्कर यांनी स्वत:चा भासवून प्लॉट खरेदीपूर्वी १५ लाख ५० हजार रुपयांचा रोख इसार केला. परंतु, भूखंडाची खरेदी करून देण्यास टाळाटाळ करून फसवणूक केल्याचे या तक्ररीत म्हटले आहे.

अकोला : दूसºयाचा प्लॉट स्वत:चा असल्याचे भासवून परस्पर विक्री करणारे उद्योजक विवेक पारस्कर यांच्याविरू ध्द प्राप्त झालेल्या तक्रारीवरू न गुरू वारी रात्री उशिरा सिव्हिल लाइन पोलसांनी गुन्हा दाखल केला.
डॉ. बिहाडे यांच्या मालकीचा राम नगरातील १६२५ चौ. फूट भूखंड उद्योजक विवेक पारस्कर यांनी स्वत:चा भासवून प्लॉट खरेदीपूर्वी १५ लाख ५० हजार रुपयांचा रोख इसार केला. परंतु, भूखंडाची खरेदी करून देण्यास टाळाटाळ करून फसवणूक केल्याचे या तक्ररीत म्हटले आहे. सिंधी कॅम्पमधील राहुल सुरेशकुमार संतानी (२६) यांच्या तक्रारीनुसार पॉपर्टी ब्रोकर उमेश राठी व राजेश शहा यांनी विवेक रामराव पारस्कर यांच्या मालकीचा राम नगरात १६२५ चौ. फूट प्लॉट विकायचा असे सांगितले. त्यानंतर वडिलांसह राहुल संतानी हे दोन्ही पॉपर्टी ब्रोकरसोबत डिसेंबर २०१५ मध्ये अखेरच्या आठवड्यात प्लॉट पाहण्यास गेले. प्लॉट पसंत पडल्याने, ४५०० रुपये प्रती चौ. फुटाने विकण्याचा उमेश राठी यांनी प्रस्ताव ठेवला. त्यानंतर विवेक पारस्कर यांच्यासोबत बोलणी झाली. त्यावेळी त्यांनी हा प्लॉट त्यांचा व भाऊ रवींद्र पारस्कर यांचा सामाईक प्लॉट असल्याचे सांगितले. त्यानंतर प्लॉट खरेदी करण्याचे निश्चित झाल्यावर, राहुल संतानी यांनी विवेक पारस्कर यांना इसारापोटी १५ लाख ५० हजार रुपये रोख दिले. त्यांनी विक्री करारनामासुद्धा लिहून दिला आणि उर्वरित रक्कम प्लॉटची मोजणी करून ताबा दिल्यावर देण्याचे ठरले. तसेच १ मार्च २०१६ रोजी किंवा त्यापूर्वी प्लॉट खरेदी करून देण्याचे ठरले. त्यानंतर राहुल संतानी यांनी त्यांना वारंवार संपर्क करून प्लॉट मिळकतीचे कागदपत्रे मागितले आणि खरेदीखत देण्याचे म्हटले. परंतु विवेक पारस्कर यांनी टाळाटाळ केली. त्यामुळे संतानी यांना शंका आल्यावर त्यांनी प्लॉटविषयी चौकशी केली असता, पारस्कर व त्यांच्या भावाचा प्लॉट नसल्याचे पुढे आले. त्यानंतर विवेक पारस्कर यांच्याशी संपर्क केल्यानंतर त्यांनी, मूळ मालकाशी भेटून खरेदी करून देण्याचे म्हणत, इसारची मुदत २ आॅगस्ट २०१७ पर्यंत वाढविण्यास सांगितले. परंतु, पारस्कर हे फसवणूक करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर संतानी यांनी पैशांची मागणी केली. त्यामुळे पारस्कर यांनी त्यांना दोन धनादेश दिले. परंतु, हे धनादेश बँकेत वटले नाहीत. त्यामुळे संतानी यांनी गुरुवारी उशिरा रात्री सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी विवेक पारस्कर यांच्याविरुद्ध भादंवि कलम ४२0, ४६४, ४६७, ४६८, ४७१ नुसार गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)
 

प्रॉपर्टी ब्रोकर उमेश राठी व त्याच्या सहकाºयांनी जमीन व प्लॉट देण्या-घेण्याच्या ४६ व्यवहारांमध्ये लक्षावधी रुपयांनी फसवणूक केली आहे. माझी फसवणूक झाल्यामुळे मी त्यांच्याविरुद्ध पोलिसांकडे अनेक तक्रारी केल्या आहेत. त्या तक्रारींचा तपास सुरू आहे, त्यामुळे लवकरच सत्य बाहेर येईल. गुरुवारी रात्री सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात माझ्याविरुद्ध दाखल झालेला गुन्हासुद्धा उमेश राठीच्या ४६ प्रकरणांपैकीच एक भाग आहे. 
-विवेक पारस्कर, उद्योजक.

 

Web Title:  The sale of the second plot itself; Crime against industrialist Vivek Paraskar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.