अकोला जिल्ह्यात बीटी कापूस बियाण्यांची विक्री सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 05:11 PM2020-05-26T17:11:08+5:302020-05-26T17:11:17+5:30
अकोला जिल्ह्यासाठी ८ लाख पाकिटे बियाण्यांची नोंदणी करण्यात आली होती त्यापैकी ५ लाख ३३ हजार ५७६ पाकिटे प्राप्त झाली आहेत.
अकोला: कापूस बियाणे विक्रीची परवानगी ३१मे ला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता परंतु पुन्हा यात बदल करण्यात आले असून,२५ मेपासून कृषी सेवा केंद्रांना विक्रीची परवानगी देण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यासाठी ८ लाख पाकिटे बियाण्यांची नोंदणी करण्यात आली होती त्यापैकी ५ लाख ३३ हजार ५७६ पाकिटे प्राप्त झाली आहेत.
जिल्ह्यातयावर्षी एक लाख साठ हजार हेक्टर वर कापूस बियाणे पेरणीचे नियोजन करण्यात आले असून.यासाठी आठ लाख बीटी कापूस बियाण्यांची नोंदणी करण्यात आली आहे.यामुळे कापूस बियाण्यांचा तुटवडा यावर्षी जाणवणार नाही असा दावा कृषी विभागामार्फत केला जात आहे .परंतु प्रत्यक्षात ५ लाख ३३ हजार ५७६ पाकिटे जिल्हयात पोहोचली आहेत.जवळपास २ लाख ६७ हजार पाकिटे हवी आहेत.यावर्षी कापसाचा पेरा वाढण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने कदाचित ८ लाख पाकिटे कमी पडण्याची शक्यता आहे..यावर्षी बीजी-१ कापसाचे दर ६३५ रुपये आणि बीजी-३ या कापसाच्या पाकिटाचे दर ७३० रुपये आहेत .हे बियाणे परवानाधारक विक्रेत्याकडून उपलब्ध होणार आहेत.विक्रेत्यांनी २६ मे पासून विक्री सुरू केली आहे. परंतु शेतकरी अद्याप तरी बियाणे खरेदी साठी बाजारात येत नसल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात कापसाचे बियाणे पाठविण्यात आले.परंतु अंत्यत कमी आहे.•