अकोल्यात दरमहा साडेचार हजार चिनी टायरची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 10:24 AM2020-06-19T10:24:49+5:302020-06-19T10:27:30+5:30

एकट्या अकोल्यात दर महिन्याला साडेचार हजार चिनी बनावटीचे टायर विकले जात आहेत.

Sales of four and a half thousand Chinese tires per month in Akola | अकोल्यात दरमहा साडेचार हजार चिनी टायरची विक्री

अकोल्यात दरमहा साडेचार हजार चिनी टायरची विक्री

Next
ठळक मुद्देतकलादू असलेल्या या टायरलाही मोठी मागणी आहे. टायरची किंमत ३ हजार रुपयांपेक्षा कमी. चीनमधील टायरचे आयुष्यही कमी.

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : भारत चीन तणावानंतर आत चिनी मालाच्या विरोधात बहिष्कारचे अस्त्र उपसण्याची तयारी नागरिकांनी केली आहे. या पृष्ठभूमीवर चिनी बनावटीच्या कोणत्या वस्तूंची विक्री सर्वाधीक होते याची माहिती घेतली असता इलेक्ट्रानिक्स वस्तू, मोबाईलसोबतच चार चाकी गाडीच्या चिनी बनावटीच्या टायरलाही नागरिकांची पसंती असल्याचे समोर आले. एकट्या अकोल्यात दर महिन्याला साडेचार हजार चिनी बनावटीचे टायर विकले जात आहेत.
भारतात कारसाठी वापरण्यात येणारे टायरही आता मोठ्या प्रमाणात चीनमधून आयात करण्यात येत आहेत. ब्रॅण्डेड कंपन्यांच्या टायरला जेवढी मागणी आहे, तेवढीच मागणी चीनमधून निर्मिती केलेल्या तसेच बऱ्याच प्रमाणात तकलादू असलेल्या या टायरलाही मोठी मागणी आहे. अकोला जिल्ह्यात चिनी टायरची विक्री महिन्याला ४ ते ४ हजार ५०० एवढी आहे. तर ब्रॅण्डेड कंपन्यांचे टायर यापेक्षा दुप्पट म्हणजेच महिन्याला ८ ते ९ हजार टायर विकल्या जात असल्याची माहिती आहे. एखाद्या कारच्या ब्रॅण्डेड कंपनीच्या टायरची किंमत ४ हजार रुपये असेल तर चीनमधील टायरची किंमत ३ हजार रुपयांपेक्षा कमीच असल्याची माहिती टायर विक्रेते रिक्कीसिंग सेठी यांनी दिली. तर चीनमधील टायरचे आयुष्यही ब्रॅण्डेड टायरपेक्षा कमीच असल्याचे वास्तव आहे. चीननिर्मित टायर अधिक प्रमाणात टॅक्सीसाठी वापरण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. घरगुती कार किंवा इतर वाहनांमध्ये अत्यंत नगण्य प्रमाणात चिनमधील टायर वापरण्यात येते. त्यामुळे स्वस्त असलेल्या चीनमधील टायरचे आयुष्यही कमी असल्याने ब्रॅण्डेड टायरच योग्य असल्याचे सेठी यांनी सांगितले.


वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा चीनमधून
देशातील कोणत्याही मोठ्या हॉस्पिटलमध्ये लावण्यात येणारी उपकरणे तसेच आरोग्य तपासणीसाठी लागणारे साहित्य आणि अ‍ॅलोपॅथीसाठी वापरण्यात येणाºया गोळ्यांच्या पावडरची मोठ्या प्रमाणात आयात ही चीनमधूनच होते. हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया तसेच तपासणीसाठी लागणारी उपकरणे चीनमधूनच आयात करण्यात येत आहे. यामध्ये व्हेंटिलेटर, आॅक्सिजन कॉन्सेट्रेटर, नेब्युलायझर, मधुमेह तपासणीसाठी येणारे यंत्र आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या स्ट्रीप, दमा तसेच अस्थमा तपासण्यासाठी आवश्यक असलेली सीपीएफ यंत्र हे चीनमधूनच आयात करण्यात येते.

Web Title: Sales of four and a half thousand Chinese tires per month in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.