सलाइनच्या बॉटलमध्ये आले रुग्णाचे रक्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 01:26 AM2017-09-25T01:26:28+5:302017-09-25T01:26:28+5:30

आपातापा : शासनाने ग्रामीण भागामध्ये रुग्णांच्या प्राथमिक  उपचार व सेवेकरिता प्राथमिक आरोग्य केंद्रांची निर्मिती केली  आहे; परंतु  आपातापा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये बेताल  कारभार सुरू असल्याने रुग्णाला लावलेल्या सलाईनमध्ये  रक्त परत गेल्याचा प्रकार २२ सप्टेंबर रोजी घडला. घुसर ये थील एका ७0 वर्षीय महिलेला सलाइन लावले असता,  सलाइन संपल्यानंतर डॉक्टरांनी लक्ष न दिल्याने या महिलेच्या  हातातील रक्त सलाइन नळीद्वारे बॉटलमध्ये जमा झाले होते.  तेथे परिचारिका हजर नसल्याने सदर रुग्ण महिला डॉ क्टरकडे सलाईनसह गेल्यावर सलाईन काढण्यात आले.      

Saline bottle comes in the patient's blood! | सलाइनच्या बॉटलमध्ये आले रुग्णाचे रक्त!

सलाइनच्या बॉटलमध्ये आले रुग्णाचे रक्त!

Next
ठळक मुद्देआपातापा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बेताल कारभाराचा  रुग्णाला फटका

लोकमत न्यूज नेटवर्क
आपातापा : शासनाने ग्रामीण भागामध्ये रुग्णांच्या प्राथमिक  उपचार व सेवेकरिता प्राथमिक आरोग्य केंद्रांची निर्मिती केली  आहे; परंतु  आपातापा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये बेताल  कारभार सुरू असल्याने रुग्णाला लावलेल्या सलाईनमध्ये  रक्त परत गेल्याचा प्रकार २२ सप्टेंबर रोजी घडला. घुसर ये थील एका ७0 वर्षीय महिलेला सलाइन लावले असता,  सलाइन संपल्यानंतर डॉक्टरांनी लक्ष न दिल्याने या महिलेच्या  हातातील रक्त सलाइन नळीद्वारे बॉटलमध्ये जमा झाले होते.  तेथे परिचारिका हजर नसल्याने सदर रुग्ण महिला डॉ क्टरकडे सलाईनसह गेल्यावर सलाईन काढण्यात आले.              
नजीकच्या आपातापा प्रा.आ. केंद्रामध्ये २२ सप्टेंबर रोजी  सकाळी ११ वाजताच्या घुसर येथील ७0 वर्षीय वृद्ध महिला  अंजनाबाई वाघ या एकट्या उपचारासाठी आल्या होत्या.  ओपीडीमधील वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक देशमुख व  वैद्यकीय अधिकारी अलका बोराखडे यांनी सदर महिलेची  तपासणी करून सलाइन लावले; परंतु तेथे आरोग्य कर्मचारी  उपस्थित न राहिल्याने सलाइन संपल्यानंतर या वृद्ध  महिलेच्या हातातील रक्त सलाइन बॉटलमध्ये जमा होऊ  लागले. ते पाहून वृद्ध रुग्ण महिलेने घाबरून आवाज  दिल्यानंतरही कोणी न आल्याने महिला स्वत: सलाइनची  बॉटल हातात घेऊन डॉक्टरांच्या ओपीडीकडे येत होती.  कट्यार येथील नागरिक सुभाष कडू त्यांच्या पत्नीला प्रा थमिक उपचाराकरिता घेऊन आले असता सदर बाब त्यांच्या  लक्षात येताच त्यांनी डॉक्टरांना सांगितले. तेव्हा डॉक्टरांनी  कर्तव्य विसरून उलट त्यांचीच कानउघाडणी केली. त्यानं तर रुग्ण महिलेवर उपचार केल्याने पुढचा प्रसंग टळला.   रुग्णांवर उपचार करताना डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांची  जबाबदारी असते; परंतु त्याचे व्यवस्थितरीत्या पालन केले  जात नाही. ओपीडी उघडण्याची वेळ सकाळी ८.३0 ते  १२.३0 असताना वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी  अकोला येथून उशिराने ९ ते १0 या वेळेत येतात.  तसेच २४  तास ७ दिवस याप्रमाणे रुग्णांना सेवा देणे असताना रात्रीच्या  वेळेत एकही जबाबदार अधिकारी अथवा आरोग्य कर्मचारी  उपस्थित राहत नाही, हे विशेष.  या बेताल कारभाराची  दखल जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य  अधिकार्‍यांनी घेऊन येथील वैद्यकीय अधिकार्‍यांना  त्याबाबत जाब विचारून कारवाई करावी, अशी मागणी  रुग्णांच्या नातेवाइकांकडून केली जात आहे. 

घुसर येथील अंदाजे ७५ वर्षीय महिला रुग्ण वाघ एकट्याच  आपातापा प्रा.आ. कंेद्रात आल्या होत्या. त्यांची तपासणी  करून त्यांना औषधोपचार पत्रिकेवर औषध लिहून देऊन  त्यांना सिस्टरला सलाइन लावण्यास सांगितले. त्यावेळी  सकाळच्या वेळेत ओपीडीमध्ये पुष्कळ रुग्ण होते. सलाइन  संपण्यास थोडा वेळ असतानाच त्या सलाइन बॉटल हातात  घेऊन ओपीडीकडे आल्या होत्या. त्यामुळे थोडे रक्त  नळीमध्ये आले होते. त्यांना ताबडतोब वॉर्डमध्ये नेऊन उ पचार करण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती चांगली  असल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले.
- डॉ. अशोक देशमुख,
वैद्यकीय अधिकारी, प्रा.आ. केंद्र, आपातापा.

माझी प्रकृती ठीक नसल्याने दवाखान्यात आली. तपासणीनं तर सलाइन लावले. ते संपल्यानंतर बॉटलमध्ये सलाइन  नळीद्वारे हातातील रक्त जमा होत होते. तेथे कोणीही  नसल्याने आवाज दिला; पण कुणीच न आल्याने तशीच  सलाइन बॉटल घेऊन डॉक्टरकडे निघाली. तेव्हा त्यांनी उ पचार केले.
- अंजनाबाई वाघ, घुसर.

माझ्या पत्नीची तब्येत बरोबर नसल्याने घेऊन आलो असता  घुसर येथील ७0 वर्षीय वृद्ध महिला हाताला लावलेली  सलाइन बॉटल हातात घेऊन ओपीडीकडे येत असताना  दिसली. तेव्हा सदर सलाइन बॉटलमध्ये रक्त जमा झाले होते.  याबाबत डॉक्टरांना लक्ष देण्यास सांगितले असता ते  माझ्यावरच चिडले.
- सुभाष कडू, कट्यार.

Web Title: Saline bottle comes in the patient's blood!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.