खारपाणपट्टय़ात वाढला तूर, मुगाचा पेरा
By admin | Published: July 1, 2016 02:03 AM2016-07-01T02:03:55+5:302016-07-01T02:03:55+5:30
मूर्तिजापूर तालुक्यात सोयाबीनपाठोपाठ कापसाचा पेरा वाढला आहे.
दीपक अग्रवाल /मूर्तिजापूर (जि. अकोला)
यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनपाठोपाठ कापूस, तूर, मूग, उडीद पिकाचे उत्पादन घेण्याकडे शेतकरी वळला आहे. खोडमाशी व एलोमोझ्ॉकच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनवर विपरीत परिणाम झाला होता. त्यामुळे शेतकर्यांना शुद्ध नफा मोठय़ा प्रमाणात गमवावा लागला. यावर्षी पीक पद्धतीत बदल होऊन खारपाणपट्टय़ात तूर, मूग या पिकांचा २५ टक्के पेरा वाढल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
तालुक्याचे ७४ हजार ६00 हेक्टर क्षेत्र लागवडयोग्य आहे. १२ हजार २१0 हेक्टर क्षेत्र केवळ सिंचनाखाली असून ६५२ हजार ३९0 हेक्टर क्षेत्र कोरडवाहू आहे.
गेल्या वर्षात खरीप हंगामात कृषी विभागाने एकूण ६९ हजार ८६0 हेक्टर क्षेत्रात ६५ हजार ८८५ हेक्टर क्षेत्रात पेरणीचा लक्ष्यांक निर्धारित केला होता. त्यांपैकी ६८ हजार ३६२ हेक्टर क्षेत्रावर पीक पेरणी करण्यात आली होती; मात्र अत्यल्प पाऊस, पेरणीस विलंब या कारणामुळे पीक उत्पादनात घट झाली. सोयाबीन हेक्टरी ६.५0 क्विंटल, मूग २.५0 क्विंटल, उडीद २.६५ क्विंटल, हरभरा ५ ते १0 क्विंटल असे उत्पादन झाले होते. यामध्ये शेकर्यांचा लागवड खर्चही निघाला नव्हता.
यावर्षी कृषी विभागाने पीक पेरणीसाठी एकूण ६९ हजार ७६0 हेक्टर सरासरी क्षेत्राकरिता ६९ हजार ४७0 हेक्टर क्षेत्र लक्ष्यांक ठेवला आहे. सोयाबीन पिकासाठी १७ हजार ५९0 सरासरी क्षेत्रात ३५ हजार हेक्टर क्षेत्र लक्ष्यांक निर्धारित केला आहे. सोयाबीनपाठोपाठ कपाशी २६ हजार ७४0 हेक्टर येत्रात १६000 हेक्टर क्षेत्र लक्ष्यांक ठेवला आहे. तुरीसाठी ८ हजार २७0, मूग ८ हजार २७0 हेक्टर क्षेत्रात अनुक्रमे १0 हजार व ३५00 लक्ष्यांक निर्धारित केला आहे. सोयाबीन व कापसाचा पेरा सर्वाधिक असला तरी तूर, मूग व उडीद पीक घेण्यासाठी २५ टक्के शेतकरी वळल्याचे चित्र आहे. सोयाबीन हे नगदी पीक आहे. याच तुलनेत मूग, तूर, उडीद, पिकांचा चांगला बाजारभाव असल्यामुळे शेतकर्यांनी यावेळी तूर, मूग, उडीद या कडधान्य पिकांकडे मोर्चा वळविला आहे.