'गर्जा महाराष्ट्र माझा...' च्या जयघोषात राष्ट्रध्वजाला मानवंदना !
By संतोष येलकर | Published: May 2, 2023 05:04 PM2023-05-02T17:04:40+5:302023-05-02T17:04:57+5:30
पोलीस वाद्यवृंदाच्या तालावर राष्ट्रगीत आणि ‘गर्जा महाराष्ट्र माझा...’ या राज्यगीताच्या जयघोषात राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.
अकोला: महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन (महाराष्ट्र दिन) सोहळा सोमवार, १ मे रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. अकोला शहरातील लाल बहादूर शास्त्री स्टेडियम येथे आयोजित जिल्हयाच्या मुख्य शासकीय समारंभात जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पोलीस वाद्यवृंदाच्या तालावर राष्ट्रगीत आणि ‘गर्जा महाराष्ट्र माझा...’ या राज्यगीताच्या जयघोषात राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.
या सोहळ्यास जिल्हा परिषद अध्यक्ष, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती आम्रपाली खंडारे, उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यू. काळे, जिल्हा कामगार अधिकारी डॉ. राजू गुल्हाणे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक वर्षा खोब्रागडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी- कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक परिवारातील सदस्य, शहिदांचे वारसदार, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
शानदार संचलन
ध्वजारोहण व राष्ट्रध्वजाला मानवंदना दिल्यानंतर पोलीस दलाने शानदार संचलन केले. या संचलनात पोलीस दल, गृहरक्षक दल , महिला पोलीस दल, अग्निशमन दल, १०८ रुग्ण वाहिका,श्वान पथक, बिनतारी संदेश विभाग आदींनी पोलीस वाद्यवृंदाच्या तालावर संचलन केले.
‘सुंदर माझा दवाखाना’ मोहिमेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सन्मान
७ ते १४ एप्रिल या कालावधीत ‘सुंदर माझा दवाखाना’, हा उपक्रम जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमध्ये राबविण्यात आला. त्यातील उत्कृष्ट तीन प्राथमिक आरोग्य केंद्र व तालुक्यातील आरोग्य उपकेंद्रांची निवड करण्यात आली. या मोहिमेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यामध्ये डॉ. मनिष वाघमारे, डॉ. आरीफ खान, डॉ. विनोद जेठवानी, डॉ. रश्मी राजेंद्र सराळे, सलोनी पोटे , डॉ. गफारिया खातून, सुचित्रा बांबल, नागरा पटले, डॉ. शिवानी लादे, रुपाली चारथळ, वैजनाथ मिसाळ, डॉ. आमिर सोहेल, माधुरी इचे, प्रवीण चापके, डॉ. वैभव परमाले, संगिता निचले, सुनिल कराळे, डॉ. अनुप्रताप जयराज, सिमा वानखडे, जितेश वाडले, शालू नांदुरकर, सुनिल हरणे, डॉ. महेश कावरे, शारदा दुबे, संजय घुगे यांचा सन्मान करण्यात आला.