उमरा येथील अंगणवाडीअंतर्गत सॅम, मॅम तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:18 AM2021-03-18T04:18:03+5:302021-03-18T04:18:03+5:30

गावात तपासणीला एका महिन्याचा कालावधी उलटून गेला तरही कुठलीच औषधी व आहार या मुलांना दिला नाही. कुपोषित बालकांची काळजी ...

Sam, mam inspection under Anganwadi at Umra | उमरा येथील अंगणवाडीअंतर्गत सॅम, मॅम तपासणी

उमरा येथील अंगणवाडीअंतर्गत सॅम, मॅम तपासणी

Next

गावात तपासणीला एका महिन्याचा कालावधी उलटून गेला तरही कुठलीच औषधी व आहार या मुलांना दिला नाही. कुपोषित बालकांची काळजी घेण्यासाठी उमरा येथे शासनाने अध्यापही कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यात आता कोरोनाची भीती पसरलेली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी तुमची रोग प्रतिकार शक्ती व निरोगी शरीर आवश्यक आहे. एकीकडे, शासन कुपोषणमुक्त गाव करण्यासाठी गावोगावी अंगणवाडीमध्ये गर्भवती माता व १ ते ६ वर्षाच्या बाळाला पोष्टिक आहार देत आहे. प्रति व्यक्ती चना १.५ किलो मसूर दाळ १ किलो तांदूळ १.५ किलो गहू १ किलो हळद अर्धापाव मिरची अर्धापाव मिठ अर्धाकिलो तेल अर्धाकिलो असा आहार उमरा येथील अंगणवाडी मध्ये दोन महिन्यातून एक वेळा मिळतो. हा आहार मिळण्यासाठी मातांना चकरा माराव्या लागत आहे. याकडे लोक प्रतिनिधींनी लक्ष देऊन आहार पुरविण्याची मागणी होत आहे.

Web Title: Sam, mam inspection under Anganwadi at Umra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.