अकोल्यात आसारामच्या आश्रमात संभाजी ब्रिगेडकडून तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 09:20 PM2018-04-25T21:20:12+5:302018-04-25T21:20:12+5:30

अकोला : अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार प्रकरणात आसाराम बापूला जोधपूर न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अकोल्यातील आसाराम बापूच्या आश्रमात तोडफोड केली. मुलींवर अत्याचार करणारा आसारामचा आश्रम अकोल्यातून हटविण्याची मागणी, या आंदोलनाद्वारे करण्यात आली.

Sambhaji Brigade in Akola's Ashram's Ashram broke down | अकोल्यात आसारामच्या आश्रमात संभाजी ब्रिगेडकडून तोडफोड

अकोल्यात आसारामच्या आश्रमात संभाजी ब्रिगेडकडून तोडफोड

googlenewsNext
ठळक मुद्देआश्रम अकोल्यातून हटविण्यासाठी आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार प्रकरणात आसाराम बापूला जोधपूर न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अकोल्यातील आसाराम बापूच्या आश्रमात तोडफोड केली. मुलींवर अत्याचार करणारा आसारामचा आश्रम अकोल्यातून हटविण्याची मागणी, या आंदोलनाद्वारे करण्यात आली.
आसाराम बापूच्या आश्रमात मुलींवर अत्याचार होत असल्याचा आरोप गत १५ वर्षांपूर्वी संभाजी ब्रिगेडने केला होता. त्यानंतर २00४ मध्येच अकोल्यातील आसाराम बापूच्या कार्यक्रमात आसाराम बापू हा बलात्कारी असल्याचे पत्रक संभाजी ब्रिगेडकडून वाटप करण्यात आले होते. संभाजी ब्रिगेडने गत १५ वर्षांपासून आसारामच्या विरोधात दंड थोपटले असून, त्याचे आश्रम तातडीने बंद करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र राज्यातील आसाराम बापूच्या आश्रमांची सखोल तपासणी करून, हे आश्रम बंद करण्यात यावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने बुधवारी केलेल्या आंदोलनाद्वारे केली आहे. संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बुधवारी पातूर रोडवरील आश्रमावर धडक देऊन या ठिकाणचे फलक फाडले, त्यानंतर आसारामच्या प्रतिमांची तोडफोड करून तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रेम गावंडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. आसारामला शिक्षा सुनावताच राज्यभरात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. मात्र अकोल्यातील पदाधिकार्‍यांनी आश्रमावरील साहित्याची तोडफोड करून, हा आश्रम अकोल्यातून हटविण्याची मागणी केली. या तोडफोडीची माहिती मिळताच जुने शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार गजानन पडघन यांनी पोलिसांसह धाव घेतली. त्यानंतर या ठिकाणची तोडफोड थांबविण्यात आली. या संदर्भात वृत्तलिहेपर्यंत पोलिसात तक्रार दाखल झाली नव्हती. 

Web Title: Sambhaji Brigade in Akola's Ashram's Ashram broke down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.