कोरोनाबाधीत रुग्णाच्या संपर्कातील ५० व्यक्तींचे घेणार नमूने!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:52 AM2021-02-20T04:52:56+5:302021-02-20T04:52:56+5:30
अकोला: जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधित आढळलेल्या प्रत्येेक रुग्णाच्या संपर्कातील ५० रुग्णांचे स्वॅब नमुने घेण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हा परिषद ...
अकोला: जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधित आढळलेल्या प्रत्येेक रुग्णाच्या संपर्कातील ५० रुग्णांचे स्वॅब नमुने घेण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने नियोजन केले आहे.
जिल्ह्यात गेल्या वीस दिवसांच्या कालावधीत कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला असून, कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामध्ये जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधीत आढळून आलेल्या प्रत्येक रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ५० व्यक्तींची आरोग्य तपासणी करुन, स्वॅब नमूने घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये अतिजोखमीच्या २० आणि कमी जोखमीच्या ३० व्यक्तींचे स्वॅब नमुने घेण्यात येणार आहेत. यासंदर्भात जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत नियोजन करण्यात आले आहे.असे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.सुरेश आसोले यांनी सांगितले.
‘पीएचसीं’मध्ये तपासणीची
विशेष मोहीम सुरु!
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आरोग्य तपासणीची विशेष मोहीम सुरु करण्यात आली असून, त्यामध्ये कोरोना विषाणू संसर्गाची लक्षणे आढळून आलेल्या व्यक्तींचे स्वॅब नमूने घेण्यात येत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.