१,३२५ जणांनी दिले नमुने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:18 AM2021-04-10T04:18:30+5:302021-04-10T04:18:30+5:30
शहरात १३३ जण पाॅझिटिव्ह अकाेला : जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाकडून महापालिकेला प्राप्त अहवालानुसार शुक्रवारी शहरातील जणांना काेराेनाची लागण ...
शहरात १३३ जण पाॅझिटिव्ह
अकाेला : जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाकडून महापालिकेला प्राप्त अहवालानुसार शुक्रवारी शहरातील जणांना काेराेनाची लागण झाली आहे. यामध्ये पूर्व झोनअंतर्गत ४८, पश्चिम झोनअंतर्गत २८, उत्तर झोनअंतर्गत २८ आणि दक्षिण झोन २९, असा एकूण १३३ नागरिकांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे.
चाचणी करा; अन्यथा दुकानाला सील
अकोला : शहरातील व्यावसायिकांना दुकाने व प्रतिष्ठाने सुरू ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काेराेना चाचणी अनिवार्य केली आहे. दुकान संचालक व दुकानांमधील सर्व कामगारांची काेराेना चाचणी केल्यानंतर त्याचा अहवाल साेबत ठेवणे बंधनकारक आहे. अहवाल निगेटिव्ह नसल्यास किंवा चाचणी न करणाऱ्या व्यावसायिकांच्या दुकानाला सील लावण्याचा इशारा शुक्रवारी मनपाने दिला.
नियमांकडे नागरिकांची पाठ
अकाेला : शहरात काेराेनाचा प्रसार झपाट्याने हाेत असून, काेराेनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. नागरिकांना साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्याची सूचना वारंवार केली जात असतानादेखील नागरिकांकडून दुर्लक्ष केले जात आहे. मनपाच्या सूचनांकडे अकाेलेकर कानाडाेळा करीत असल्यामुळे शहरात काेराेनाचा प्रसार वाढला आहे.
नियमांचे उल्लंघन; २५ हजारांचा दंड
अकाेला : लाॅकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांसह व्यावसायिकांजवळून मनपाने २५ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्याची कारवाई शुक्रवारी केली. पूर्व झोन, पश्चिम झोन, उत्तर झोन, दक्षिण झोन आणि विशेष पथकाद्वारे मास्क न घालणाऱ्या एकूण ४८ नागरिकांना ९ हजार ६०० रुपये व लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या १४ व्यावसायिकांना १६ हजार रुपये, असा एकूण २५ हजार ६०० रुपये दंड आकारला.
डासांची पैदास वाढली!
अकाेला : माेर्णा नदीपात्रात तुंबलेल्या पाण्यामध्ये डासांची पैदास वाढली असून, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांचे आराेग्य धाेक्यात आले आहे. या परिसरात फवारणी करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांकडून सातत्याने मनपाकडे केली जात आहे. हिवताप विभागाने शहरातील काही भागांत फवारणीला सुरुवात केली असून, नदीकाठ परिसरात फवारणीची मागणी हाेत आहे.