संचमान्यतेमध्ये दोन लाखांवर विद्यार्थ्यांचे आधार लिकिंगच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 02:00 AM2017-10-13T02:00:55+5:302017-10-13T02:02:31+5:30

आधार क्रमांक अपलोड करण्याची अंतिम मुदत १६ ऑक्टोबरपर्यंत देण्यात आली असल्यामुळे सध्या शिक्षकांची विद्यार्थ्यांची माहिती, आधार क्रमांक भरण्याची लगबग सुरू आहे. परंतु हजारो विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नसल्यामुळे त्यांची माहिती संचमान्यतेमध्ये कशी भरावी. असा प्रश्न उपस्थित होत आहे.

sanchmanyata above 2 lak students not linked aadhar | संचमान्यतेमध्ये दोन लाखांवर विद्यार्थ्यांचे आधार लिकिंगच नाही!

संचमान्यतेमध्ये दोन लाखांवर विद्यार्थ्यांचे आधार लिकिंगच नाही!

googlenewsNext
ठळक मुद्दे१६ ऑक्टोबरपर्यंत मुदततर शिक्षकांवर अतिरिक्तचे संकट

नितीन गव्हाळे । 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: २0१७ व १८ या वर्षाच्या संचमान्यतेमध्ये विद्यार्थ्यांचा समावेश करण्यासाठी त्यांचे आधार क्रमांक अपलोड करावे लागत आहे. आधार क्रमांक अपलोड करण्याची अंतिम मुदत १६ ऑक्टोबरपर्यंत देण्यात आली असल्यामुळे सध्या शिक्षकांची विद्यार्थ्यांची माहिती, आधार क्रमांक भरण्याची लगबग सुरू आहे. परंतु हजारो विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नसल्यामुळे त्यांची माहिती संचमान्यतेमध्ये कशी भरावी. असा प्रश्न उपस्थित होत आहे. संचमान्यतेमध्ये हजारो विद्यार्थ्यांचे आधार लिकिंग होत नसल्याने दरवर्षी अनेक शिक्षकांवर अतिरिक्त ठरण्याची वेळ येते. पुढीलवर्षी सुद्धा हे संकट कायम राहण्याची शक्यता आहे. 
जिल्हा परिषद, मनपा, न.प. सह खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी संख्या घटत असल्याने, शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. त्यातही शासनाने यातील गैरप्रकार रोखण्यासाठी संचमान्यतेमध्ये प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांच्या माहितीसह त्यांचा आधार क्रमांक देणे अनिवार्य केले आहे. परंतु संचमान्यतेमध्ये विद्यार्थ्यांचा, वर्गाचा समावेश करताना, शिक्षकांना मोठी कसरत करावी लागत आहे. अतिरिक्त ठरण्याची वेळ आपल्यावर येवू यासाठी दृष्टीकोनातून शिक्षक धावपळ करून विद्यार्थ्यांचे आधार कार्ड मिळवून, त्यांचे क्रमांक संचमान्यतेमध्ये समावेश करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यातही वर्गांंमधील अध्र्याधिक विद्यार्थ्यांचे आधारकार्ड नसल्याने, संचमान्यतेमध्ये त्यांचा समावेश करावा तरी कसा? असा प्रश्न शिक्षकांसमोर निर्माण झाला आहे. एका वर्गातील अध्र्याधिक विद्यार्थ्यांंचे आधार कार्ड, त्याचा क्रमांक संचमान्यतेमध्ये समाविष्ट केला नाहीतर शिक्षकांवर अतिरिक्त ठरण्याची वेळ येत आहे. यावर्षी सुद्धा अनेक शिक्षकांना विद्यार्थ्यांंच्या संख्येअभावी अतिरिक्त ठरावे लागले. २0१७ व १८ च्या संचमान्यतेमध्ये विद्यार्थ्यांंचा समावेश करण्यासाठी शिक्षण विभागाने १६ ऑक्टोबरपर्यंंत वेळ दिली आहे.

संचमान्यतेमध्ये विद्यार्थ्यांंची आधार लिंकिंग महत्वाची आहे. त्यासाठी १६ ऑक्टोबरपर्यंंत वेळ आहे. शिक्षकांनी त्यांच्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांंचा संचमान्यतेमध्ये समावेश करावा आणि पुढील वर्षी होणारी गैरसोय टाळावी. 
- प्रकाश मुकूंद, शिक्षणाधिकारी
माध्यमिक जि.प. अकोला

Web Title: sanchmanyata above 2 lak students not linked aadhar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.