'कृषी'च्या ९१.६४ लाखांच्या योजना राबविण्यास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:14 AM2021-06-03T04:14:39+5:302021-06-03T04:14:39+5:30

अकोला : जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत चालू आर्थिक वर्षात शेतकऱ्यांसाठी ९० टक्के अनुदानावर ९१ लाख ६४ हजार रुपयांच्या योजना ...

Sanction for implementation of 'Agriculture' schemes worth Rs 91.64 lakh | 'कृषी'च्या ९१.६४ लाखांच्या योजना राबविण्यास मंजुरी

'कृषी'च्या ९१.६४ लाखांच्या योजना राबविण्यास मंजुरी

googlenewsNext

अकोला : जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत चालू आर्थिक वर्षात शेतकऱ्यांसाठी ९० टक्के अनुदानावर ९१ लाख ६४ हजार रुपयांच्या योजना राबविण्यास जिल्हा परिषद कृषी समितीच्या सभेत बुधवारी मंजुरी देण्यात आली. मंजूर करण्यात आलेल्या योजनांतर्गत लवकरच लाभार्थींकडून अर्ज मागविण्याचेही सभेत ठरविण्यात आले.

जिल्हा परिषद सेस फंडातून २०२१-२२ या आर्थिक वर्षात ९० टक्के अनुदानावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्लास्टिक ताडपत्री, एचडीपीई पाइप, स्पायरल

सेपरेटर, बॅटरी ऑपरेटेड पॉवर स्प्रेयर व सेंद्रिय खत पुरविणे इत्यादी योजना ९१ लाख ६४ हजार रुपयांच्या निधीतून राबविण्यास या सभेत मंजुरी देण्यात आली. संबंधित योजनांतर्गत लाभार्थींकडून लवकरच अर्ज मागविण्याचे सभेत ठरविण्यात आले. जिल्हा परिषद कृषी सभापती पंजाबराव वडाळ यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन घेण्यात आलेल्या या सभेला समितीचे सदस्य संजय अढाऊ, अनंत अवचार, नीता गवई, गीता मोरे, वेणू

डाबेराव, योगिता रोकडे व संबंधित अधिकारी सहभागी झाले होते.

Web Title: Sanction for implementation of 'Agriculture' schemes worth Rs 91.64 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.