वाळू टंचाईचा घरकुल बांधकामांना फटका; ६३६९ घरकुलांची कामे रेंगाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 02:03 PM2019-05-04T14:03:20+5:302019-05-04T14:05:57+5:30

मोफत वाळूची उचल करण्यासाठी वाळू घाटांत वाळू उपलब्ध नसल्याने, जिल्ह्यातील ग्रामीण भागात ६ हजार ३६९ घरकुलांची बांधकामे कामे रेंगाळली आहेत.

Sand scarcity constructions stopped of 636 9 Housework works in Akola | वाळू टंचाईचा घरकुल बांधकामांना फटका; ६३६९ घरकुलांची कामे रेंगाळली

वाळू टंचाईचा घरकुल बांधकामांना फटका; ६३६९ घरकुलांची कामे रेंगाळली

Next
ठळक मुद्देजिल्ह्यातील २० वाळू घाटांपैकी ११ वाळू घाटांचा आॅनलाइन लिलाव करण्यात आला. उर्वरित ९ वाळू घाट पाटबंधारे विभागांतर्गत जिल्ह्यातील सिंचनाच्या कामांसाठी आरक्षित करण्यात आले.मोफत वाळूची उचल करण्याकरिता वाळू घाटांत वाळू उपलब्ध नसल्याने, जिल्ह्यात घरकुलांची कामे रेंगाळली आहेत.

- संतोष येलकर

अकोला: प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल बांधकामांसाठी लाभार्थींना पाच ब्रास वाळू मोफत उपलब्ध करून द्यायची आहे; मात्र मोफत वाळूची उचल करण्यासाठी वाळू घाटांत वाळू उपलब्ध नसल्याने, जिल्ह्यातील ग्रामीण भागात ६ हजार ३६९ घरकुलांची बांधकामे कामे रेंगाळली आहेत. त्यामुळे वाळू टंचाईचा घरकुलांच्या बांधकामांना फटका बसल्याचे वास्तव समोर येत आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सन २०१६-१७ ते १८-१९ या तीन वर्षात जिल्ह्यातील ग्रामीण भागात १८ हजार ८३६ घरकुलांच्या बांधकामांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी एप्रिल अखेरपर्यंत १२ हजार ४६७ घरकुलांची कामे पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित घरकुलांची बांधकामे करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गत २४ फेबु्रवारी रोजीच्या शासन निर्णयानुसार पर्यावरण परवानगी प्राप्त झालेल्या वाळू घाटांतून घरकुल बांधकामांसाठी लाभार्थींना प्रत्येकी पाच ब्रास वाळू मोफत उपलब्ध करून द्यायची आहे. तसेच मोफत वाळूची उचल संबंधित लाभार्थीने करावयाची आहे. दरम्यान, राज्य पर्यावरण समितीकडून परवानगी मिळाल्यानंतर गत १६ मार्च रोजी जिल्ह्यातील २० वाळू घाटांपैकी ११ वाळू घाटांचा आॅनलाइन लिलाव करण्यात आला. तर उर्वरित ९ वाळू घाट पाटबंधारे विभागांतर्गत जिल्ह्यातील सिंचनाच्या कामांसाठी आरक्षित करण्यात आले. घरकुलांच्या बांधकामांसाठी लाभार्थींना मोफत वाळूची उचल करण्याकरिता वाळू घाटांत वाळू उपलब्ध नसल्याने, जिल्ह्यात घरकुलांची कामे रेंगाळली आहेत. त्यामुळे वाळू टंचाईच्या परिस्थितीत जिल्ह्यातील घरकुलांच्या बांधकामांना फटका बसला आहे.

पूर्ण करण्यात आलेली अशी आहेत घरकुलांची कामे!
तालुका            घरकुल
अकोला               २२०७
अकोट                 २६५६
बाळापूर              १५३६
बार्शीटाकळी          ७५६
मूर्तिजापूर            २१५८
पातूर                  १०७६
तेल्हारा             २०७८
...........................................
एकूण              १२४६७

पाणीटंचाईचेही सावट!
तापत्या उन्हासोबतच जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होत असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. तहान भागविण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण असताना घरकुल बांधकामासाठी लागणारे पाणी कोठून आणणार, असा प्रश्न घरकुल लाभार्थींसमोर निर्माण झाला आहे. त्यानुषंगाने घरकुल बांधकामांसाठी वाळू टंचाईच्या प्रश्नासोबतच पाणीटंचाईचेही सावट निर्माण झाले आहे.

सिंचनाच्या कामांसाठी नऊ वाळू घाट आरक्षित!
राज्य पर्यावरण समितीच्या परवानगीनंतर जिल्ह्यातील २० वाळू घाटांपैकी ११ वाळू घाटांचा लिलाव करण्यात आला असून, ९ वाळू घाट पाटबंधारे विभागांतर्गत जिल्ह्यातील सिंचनाच्या कामांसाठी आरक्षित करण्यात आले. त्यामध्ये अकोला तालुक्यातील २, अकोट तालुक्यात १, बाळापूर तालुक्यात ५ व मूर्तिजापूर तालुक्यातील १ वाळू घाटाचा समावेश आहे. पर्यावरण परवानगी प्राप्त वाळू घाटातून घरकुलांच्या बांधकामांसाठी लाभार्थींना पाच ब्रास मोफत वाळू उपलब्ध करून द्यायची आहे; मात्र घरकुल बांधकामांसाठी लागणारी वाळू जिल्ह्यातील वाळू घाटांत उपलब्ध नसल्याचे जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दोड यांनी सांगितले.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्ह्यात घरकुलांची बांधकामे करण्यासाठी वाळू टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे; मात्र यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून वाळू टंचाईच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कामे मार्गी लावून जिल्ह्यातील घरकुल बांधकामांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार आहे.
- आयुष प्रसाद
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

 

Web Title: Sand scarcity constructions stopped of 636 9 Housework works in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.