दादाराव देशमुख यांना सेवाश्री पुरस्कार
By admin | Published: December 6, 2015 02:18 AM2015-12-06T02:18:20+5:302015-12-06T02:18:20+5:30
२१ वा सेवाश्री पुरस्कार कृषी क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल जाहीर.
अकोला: विदभर्केसरी स्व. ब्रजलालजी बियाणी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ह्यक्विक अँडह्णच्या वतीने दिला जाणारा २१ वा सेवाश्री पुरस्कार कृषिभूषण दादाराव आनंदराव देशमुख यांना त्यांच्या कृषी क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल जाहीर झाला आहे. अकोला व वाशिम जिल्ह्यात विविध क्षेत्रात पडद्यामागे राहून निस्वार्थ सेवा करणार्या व्यक्तींचा सन्मान म्हणून त्यांना मागील २0 वर्षांंंपासून सेवाश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. सेवाश्री पुरस्काराचे संस्थापक अकोल्यातील ह्यक्विक अँडह्ण प्रतिष्ठानचे संचालक समाजसेवक सत्यनारायण रांदड होते. त्यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र विजय रांदड यांनी सेवाश्री पुरस्काराची परंपरा अखंडितपणे सुरू ठेवली आहे. यावर्षी अकोला व वाशिम जिल्ह्यातून निवड समितीला प्राप्त झालेल्या प्रस्तावांपैकी अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील चरणगाव येथील प्रगतिशील शेतकरी दादाराव देशमुख यांची सेवाश्री पुरस्काराकरिता निवड समितीने एकमताने निवड केली आहे. दादाराव यांनी चरणगावसारख्या आडवळणाच्या गावात सिंचन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन यापूर्वी शासनाने त्यांना कृषिभूषण, जिल्हा परिषदेने कृषिमित्र व लोकमतने कृषिरत्न पुरस्कार देऊन गौरविले आहे. देशमुख यांच्या निस्वार्थ कार्याची दखल घेऊनच त्यांची यंदाच्या सेवाश्री पुरस्काराकरिता निवड करण्यात आली आहे. लवकरच जाहीर समारंभात देशमुख यांना सेवाश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे, असे क्विक अँडचे संचालक विजय रांदड यांनी सांगितले.