स्वच्छता अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप यावे!
By admin | Published: November 7, 2014 12:44 AM2014-11-07T00:44:32+5:302014-11-07T00:44:32+5:30
लोकमतच्या परिचर्चेत पदाधिकारी-अधिकार्यांमध्ये उमटला सूर
अकोला : स्वच्छता ही सामाजिक जबाबदारी आहे, त्यामुळे स्वच्छता अभियानाबाबत व्या पक जनजागृती आणि प्रत्यक्ष कृतीवर भर देण्याची गरज असून, स्वच्छता अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप आले पाहिजे, असा सूर गुरुवारी लोकमतच्यावतीने आयोजित परिचर्चेत स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी आणि अधिकार्यांमध्ये उमटला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने केंद्र शासनामार्फत देशभरात स्वच्छ भारत मिशन राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने लोकमत कार्यालयात स्वच्छता अभियानाची अंमलबजावणीह्ण या विषयावर आयोजित परिचर्चेला उपमहापौर विनोद मापारी, निवासी उ पजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी तथा प्रभारी तहसीलदार राजेश जाधव, जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता अभियान कक्षाचे संवाद सल्लागार राजेश डहाके, सांगवी मोहाडीचे उपसरपंच दिनकर वाघ, मनपा स्वच्छता विभागाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी सुरेश पुंड उपस्थित होते. अकोला शहरात कचर्याची विल्हेवाट आणि स्वच्छतेसाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती उपस्थित मनपा पदाधिकारी व अधिकार्यांनी दिली. तसेच स्वच्छता अभियानाच्या अंमलबजावणीत जिल्ह्यात करावयाच्या उपाययोजना आणि करण्यात आलेले नियोजन यासंदर्भात जिल्हा प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकार्यांनी यावेळी विचार मांडले.
जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी तसेच प्रशासनातील विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचार्यांच्या सहकार्यातून स्वच्छता अभियानाची अंमलबजवणी करण्यात येत आहे. स्वच्छता ही सामाजिक जबाबदारी आहे, या भावनेतून जिल्ह्यात स्वच्छता अभियान राबविण्याची गरज आहे. त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात स्वच्छतेसंदर्भात जनजागृती करण्यात येणार असून, जागृती आणि प्रत्यक्ष कृ तीवर भर देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. स्वच्छता मोहिमेतील सातत्य टिकवून ठेवण्याची गरज असून, या अभियानात प्रत्येकाने सहकार्य करण्याची आवश्यकता आहे.
सामूहिक प्रयत्नातून आणि सहकार्यातून स्वच्छता अभियान यशस्वी होणार आहे, त्यासाठी स्वच्छता अभियानाला जिल्ह्यात लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले पाहिजे. त्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याची तयारी यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि अधिकार्यांनी बोलून दाखविली.