स्थायी समितीच्या सभापतीपदी संजय बडाेणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:19 AM2021-03-10T04:19:24+5:302021-03-10T04:19:24+5:30
मनपातील स्थायी समितीच्या सभापतीपदाचा कार्यकाळ १ मार्च राेजी संपल्यामुळे या पदाच्या निवडीसाठी ९ मार्च राेजी मनपाच्या मुख्य सभागृहात विशेष ...
मनपातील स्थायी समितीच्या सभापतीपदाचा कार्यकाळ १ मार्च राेजी संपल्यामुळे या पदाच्या निवडीसाठी ९ मार्च राेजी मनपाच्या मुख्य सभागृहात विशेष सभेचे आयाेजन करण्यात आले हाेते. सत्ताधारी भाजपच्यावतीने प्रभाग क्रमांक १९ मधील नगरसेवक संजय बडाेणे यांनी उमेदवारी अर्ज सादर केला हाेता. १६ सदस्यीय स्थायी समितीमध्ये सत्ताधारी भाजपचे १० सदस्य असल्यामुळे भाजप उमेदवाराचा विजय निश्चित मानल्या जात हाेता. समितीमध्ये विराेधी पक्ष काॅंग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादीचे प्रत्येकी दाेन सदस्य आहेत. अशास्थितीत शिवसेनेने काॅंग्रेसच्या मदतीने नगरसेविका प्रमीला गीते यांचा उमेदवारी अर्ज सादर केला हाेता. मंगळवारी निवडणूक पार पडली असता भाजपचे संजय बडाेणे यांना १० तर सेना, काॅंग्रेसच्या उमेदवार प्रमीला गीते यांना चार मते मिळाली. सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर उपस्थित हाेते. यावेळी जिल्हाधिकारी पापळकर, महापाैर अर्चना मसने, मनपाचे प्रभारी आयुक्त डाॅ.पंकज जावळे यांच्यासह मावळते सभापती सतीष ढगे, सभागृहनेत्या याेगीता पावसाळे, आरती घाेगलीया, आशिष पवित्रकार, मंगला साेनाेने, आम्रपाली उपर्वट, माजी नगरसेवक जयंत मसने यांनी नवनिर्वाचित सभापती बडाेणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
वर्षभरापूर्वीच बडाेणे यांचे नाव घाेषित
भारतीय जनता पार्टीच्या शिर्षस्थ नेत्यांच्या बैठकीत घेतल्या जाणाऱ्या निर्णयांबद्दल कमालीची गाेपनियता बाळगली जाते. स्थानिक पदाधिकारीदेखील गाेपनियतेचे कसाेशीने पालन करतात,असे आजवर दिसून आले आहे. झाेन समिती सभापती पदाच्या निवड प्रक्रियेतही उमेदवारांच्या नावांबद्दल गुप्तता पाळली जाते. या शिस्तीला व गाेपनियतेला बाजूला सारत चक्क वर्षभरापूर्वीच सभापती पदासाठी संजय बडाेणे यांचे नाव घाेषित करण्यात आले हाेते,हे येथे उल्लेखनिय.