जिल्हाध्यक्षपदी संजय चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:22 AM2021-07-14T04:22:33+5:302021-07-14T04:22:33+5:30
------------------ अकोटात नवजात शिशु बालकांचे लसीकरण सुरू अकोटः नागरी आरोग्य केंद्र गोलबाजार येथे नवजात शिशु बालकांचे लसीकरण सुरू ...
------------------
अकोटात नवजात शिशु बालकांचे लसीकरण सुरू
अकोटः नागरी आरोग्य केंद्र गोलबाजार येथे नवजात शिशु बालकांचे लसीकरण सुरू करण्यात आले असून, महाराष्ट्र शासनाने नव्याने प्रसिद्ध केलेली निम्यो कोकल कंजूवेट नावाची पहिली लस दि. १२ जुलै रोजी देण्यात आली. शहरात सहा आठवड्याचा असलेल्या नवजात शिशु बालकांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. यावेळी नागरी आरोग्य केंद्र गोल बाजार येथे श्रावणी चंद्रकांत थोरात या बालकाला लस देऊन लसीकरण सुरू करण्यात आले. यावेळी नागरी आरोग्य केंद्र गोलबाजारचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजयश्री गुल्हाने, आरोग्य सेविका नंदा लठाड, आशा स्वयंसेविका श्रीमती वसू, घनबहादूर व नागरी आरोग्य केंद्र गोल बाजाराचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सर्व नवजात शिशुंना निम्यो कोकल कंजूवेट लस देण्याबाबत जाहीर आवाहन केले असून, लस विनामूल्य व सुरक्षित असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.