संस्कृत स्तोत्र पठण स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:15 AM2021-01-14T04:15:58+5:302021-01-14T04:15:58+5:30
अकोला : शंकरालालजी खंडेलवाल यांच्या जन्म शताब्दी निमित्त संस्कृत स्तोत्र पठण स्पर्धेचे ऑनलाइन आयोजन केले होते. या स्पर्धेत अनया ...
अकोला : शंकरालालजी खंडेलवाल यांच्या जन्म शताब्दी निमित्त संस्कृत स्तोत्र पठण स्पर्धेचे ऑनलाइन आयोजन केले होते. या स्पर्धेत अनया भुसारी प्रथम, मुकुंद भट्ट द्वितीय तर अनिल भाकरे याने तृतीय क्रमांक मिळविला. यावेळी रास्वसेचे विभाग प्रचारक राहुल चव्हाण, प्रा.विवेक बिडवे, डाॅ.तारा हातवळणे, गोपाल खंडेलवाल आदी उपस्थित होते.
लरातोमध्ये राष्ट्रीय युवा दिन साजरा
अकोला : लरातो वाणिज्य महाविद्यालयात एनसीसीच्या वतीने राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य डाॅ.एस.जी. चापके, एनसीसी लेफ्टनंट डाॅ.अनिल तिरकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात डाॅ.चापके यांनी युवकांनी महापुरुषांच्या चारित्र्याचे अवलोकन करावे, असे आवाहन केले. संचालन रोहिणी देव तर आभार प्रदर्शन खुशी टिकार यांनी केले. या कार्यक्रमात कोरोना नियमांचे पालन करण्यात आले.
श्रीराम विद्यालयात मातांचा सत्कार
अकोला : स्थानिक काैलखेड परिसरातील श्रीराम विद्यालयामध्ये माँ जिजाऊ जयंती निमित्ताने वर्ग १० आणि १२ मधून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांच्या मातांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिवा मोहोड, श्रीमती वाघोडे, रेखाताई बोराडे, सुशिला खाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रा.गजानन चाैधरी यांनी केले. त्यांनी कार्यक्रमा मागची भूमिका विषद केली. कार्यक्रमाला दर्शना कावरे, पूजा पट्टेबहादुर, विलास राऊत, शैला भालकर, रामेश्वर मालखेडे, संगीता लहामगे, मनोहर चाैरीपगार, दयाराम चंदन, जितेंद्र मोहोड आदी उपस्थित होते.
कला महाविद्यालयात जिजाऊ जन्माेत्सव
अकाेला : मलकापूर येथील कला महाविद्यालयात राजमाता जिजाऊ यांची तसेच स्वामी विवेकानंद यांची जयंती माेठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी डाॅ.गीताली पांडे, डाॅ.अंजली कुळकर्णी, डाॅ.डी.जी. गटकर, प्रा.प्रवीण उगले, डाॅ.दीपाली गावंडे, डाॅ. दिलीप सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
टेबल टेनिस स्पर्धेत राज कोठारी प्रथम
अकोला : नागपूर येथे १० जानेवारी रोजी संपन्न झालेल्या विदर्भ टेबल टेनिस स्पर्धेमध्ये सब ज्युनिअर गटात राज कोठारी याने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्याला प्रभजीतसिंग बछेर, ॲड.मोतीसिंह मोहता, गणेश मंगरुळकर, महेंद्र कोठारी यांचे मार्गदर्शन लाभले, अशी माहिती मेहेंद्र कोठारी यांनी दिली.
क्रिकेट क्लबच्या वतीने बक्षीस वितरण
अकोला : राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त क्रांती क्रिकेट क्लबतर्फे टेनिस बाॅल सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे बक्षीस वितरण पार पडले. यावेळी आ.अमोल मिटकरी, सचिन पाचपोर, राम म्हैसने, सपना झासकर, रामधन कोंडे, मंगेश ताडे, सुदर्शन किराडे आदी उपस्थित होते.
जिल्हा रुग्णालयात जिजाऊ जयंती
अकोला : जिल्हा स्त्री रुग्णालयात राजमाता जिजाऊ यांची माेठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शुभांगी किनगे, नीलिमा तिजारी, सुनिता श्रीवास, संगीता मराठे, रंजना हरणे, अपर्णा कावरे, सुनिता वाडे, पुष्पा बगे, किरण बगे, बेबी मश्राम आदी महिलांनी जिजाऊंना अभिवादन केले.