निवड बुद्धिबळ स्पर्धेत अकोल्याची संस्कृती वानखडे राज्यातून प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2021 08:07 PM2021-06-08T20:07:13+5:302021-06-08T20:09:14+5:30
Chess tournament प्रथम क्रमांक पटकाविण्याचा व राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मिळविला.
अकोला : महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेच्यावतीने ६ ते ८ जून या कालावधित ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या निवड बुद्धिबळ स्पर्धेत अकोल्याची संस्कृती वानखडे हिने १६ वर्षे वयोगटातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
जागृती विद्यालयाची विद्यार्थिनी संस्कृती वानखडे हीने १६ वर्षे मुलींच्या वयोगटात भाग घेऊन प्रथम क्रमांक पटकाविण्याचा व राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मिळविला.
ही १६ वर्षे वयोगटातील स्पर्धा स्विस लीगच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार एकूण नऊ फेर्यांत आॅनलाईनने टाॅर्नेलो या संकेत स्थळावर दि. ६ ते ८ जून या कालावधीत पार पडली. प्रत्येक दिवशी तीन फेर्या खेळण्यात आल्या.
संस्कृती वानखडेने या नऊ फेर्यांत अनुक्रमे देवांशी गावंडे, अनईशा पिंकेश नहर, क्रीष्णा टावरी, सिद्धी पाटील, मृण्मयी बागवे, भाग्यश्री पाटील, तनिषा बोरामणीकर, सानिया रफ़िक़ तडवी व आहाना पाच्चिगर यांना मात दिली. या स्पर्धेमध्ये प्रमुख पंच म्हणून आंतराष्ट्रीय पंच स्वप्नील बनसोड (नागपूर), विवेक सोहनी (रत्नागिरी), प्रवीण ठाकरे (जळगाव खानदेश) यांनी काम पाहिले.
संस्कृतीच्या या यशाबद्दल जागृती विद्यालयाचे मुख्याध्यापक अरूण राऊत, उपमुख्याध्यापक राजेंद्र जळमकर व पर्यवेक्षिका कोळमकर यांनी कौतुक केले आहे.