पोहरादेवी येथे आज संत सेवालाल यात्रोत्सव

By Admin | Published: April 15, 2016 02:06 AM2016-04-15T02:06:20+5:302016-04-15T02:06:20+5:30

भाविकांची मांदियाळी: विविध मंत्र्यांची उपस्थिती.

Sant Sewa Lal Yatra Yatra today in Poharadevi | पोहरादेवी येथे आज संत सेवालाल यात्रोत्सव

पोहरादेवी येथे आज संत सेवालाल यात्रोत्सव

googlenewsNext

मानोरा( जि. वाशिम): बंजारा काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पोहरादेवी येथे रामनवमीच्या पावन पर्वावर दरवर्षीप्रमाणे संत सेवालल जन्मोत्सवानिमित्त भव्य यात्ना महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, या ठिकाणी देशभरातून लाखो भाविक दशर्नासाठी येणार आहेत.
पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त बंजारा समाजबांधवांची देशप्रसिद्ध यात्ना भरते. यात्नेत देशाच्या कानाकोपर्‍यातून लाखोंच्या संख्येत भाविक येतात. यंदा या सोहळ्यात १५ एप्रिल रोजी दुपारी १२.५0 वाजता श्री सेवालाल महाराज बंजारा महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी, ९.३0 वाजता श्रीक्षेत्न पोहरादेवी मंदिर परिसरात ह्यस्वच्छ यात्ना, सुंदर यात्ना, शुद्ध यात्नाह्ण अभियानाचे उद्घाटन मंत्नी महोदयांच्या हस्ते होईल. या सोहळ्यासाठी राज्याचे मंत्नीदेखील यात्नेत हजेरी लावणार आहेत. यामध्ये राज्याच्या ग्रामविकास, जलसंधारण, रोजगार हमी योजना आणि महिला व बालविकास विभागाच्या मंत्नी पंकजा मुंडे, गृह राज्यमंत्नी तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्नी डॉ. रणजित पाटील व महसूल राज्यमंत्नी संजय राठोड यांचा समावेश आहे. दरम्यान, पोहरादेवी येथे गुरुवारी संत सेवालाल महाराजांच्या सुवर्ण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, तसेच देवी-देवतांचे पूजन करण्यात आले. तसेच बंजारा धर्मपीठाची स्थापनाही करण्यात आली. चैतन्य गोपाल महाराजांनी सत्संग स्नेहमिलन कार्यक्रमात भाविकांना मार्गदर्शन केले.

Web Title: Sant Sewa Lal Yatra Yatra today in Poharadevi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.