संत वासुदेव महाराज जयंती महोत्सव रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:17 AM2021-03-07T04:17:46+5:302021-03-07T04:17:46+5:30
संत वासुदेव महाराज यांचा जयंती उत्सव सोहळा दरवर्षी भाविकांच्या व वारकरी दिंड्यांच्या भव्य उपस्थित साजरा होत असतो. यावर्षी हा ...
संत वासुदेव महाराज यांचा जयंती उत्सव सोहळा दरवर्षी भाविकांच्या व वारकरी दिंड्यांच्या भव्य उपस्थित साजरा होत असतो. यावर्षी हा सोहळा रद्द करण्यात आला असला तरीसप्ताहादरम्यान श्री क्षेत्र श्रद्धासागर येथे नित्यनियमाप्रमाणे पहाटे काकडा-आरती, श्रींचा अभिषेक, श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी भावकथा निरूपण, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत दररोज होणार आहे. या सर्व सोहळ्यामध्ये भाविकांना सहभागी होता येत नसले तरी ऑनलाइन ची व्यवस्था संस्थेतर्फे करण्यात येणार आहे. भाविकांनी आपापल्या घरी ९ ते १६ मार्च या कालावधीत ग्रंथराज ज्ञानेश्वरी तसेच संत वासुदेव महाराज चरित्र, संत गजानन महाराज पासष्टी,संत ज्ञानेश्वरदास विरचित ३७ ग्रंथाचे पारायण करावे. १६ मार्च म्हणजे फाल्गुन शुद्ध तृतीया रोजी महाराजांचा जन्मदिवस भाविकांनी आपल्या घरीच साजरा करावा असे आवाहन संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेचे अध्यक्ष हभप वासुदेवराव महल्ले व विश्वस्त मंडळाने केले आहे.