जिल्ह्यात संततधार; सलग चौथ्या दिवशी पावसाचा जोर कायम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:23 AM2021-08-21T04:23:59+5:302021-08-21T04:23:59+5:30
चार दिवसांत ७० मिमी. पाऊस जिल्ह्यात मंगळवारपासून सतत पाऊस बरसत आहे. ऑगस्ट महिन्यात सोमवारपर्यंत २२.७ मिमी पाऊस झाला होता. ...
चार दिवसांत ७० मिमी. पाऊस
जिल्ह्यात मंगळवारपासून सतत पाऊस बरसत आहे. ऑगस्ट महिन्यात सोमवारपर्यंत २२.७ मिमी पाऊस झाला होता. तर शुक्रवारी सकाळपर्यंत ९३.३ मिमी पाऊस बरसला. जिल्ह्यात गत चार दिवसांमध्ये ७०.६ मिमी पावसाची नोंद झाली.
ऑगस्टमधील तालुकानिहाय पाऊस
तालुका पाऊस (मिमी)
अकोट ७७.१
तेल्हारा ७७.९
बाळापूर ८४.०
पातूर १५७.२
अकोला ९०.५
बार्शीटाकळी ८४.८
मूर्तिजापूर १००.४
काटेपुर्णा ९३, तर वान ६६ टक्के भरले!
जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प असलेल्या काटेपुर्णा प्रकल्पात ९३.७५ टक्के, तर वान प्रकल्पात ६६.६४ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. वान प्रकल्पाच्या क्षेत्रात सतत पाऊस सुरूच असल्याने पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. काटेपुर्णाची २ वक्रव्दारे ३० सेंमी उंचीने उघडली आहेत.