महिलांना साड्या, गरजूंना दिली कपड्यांची ऊब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:13 AM2021-07-24T04:13:22+5:302021-07-24T04:13:22+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दीर्घायुष्यासाठी डाॅ. पंदेकृवी येथील शिव मंदिरात जलाभिषेक, अशोकवाटिका येथे बुद्धवंदना, जुने शहरातील गाडगेनगर येथे ...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दीर्घायुष्यासाठी डाॅ. पंदेकृवी येथील शिव मंदिरात जलाभिषेक, अशोकवाटिका येथे बुद्धवंदना, जुने शहरातील गाडगेनगर येथे भजनी महिला मंडळातील महिलांना साड्यावाटप करण्यात आले. जुने शहर येथे मदरशांतील मुले व धर्मगुरू तसेच दिवान शाह दाता दर्गा येथे प्रार्थना करण्यात आली. सूर्योदय बालगृह व खडकी येथील वृद्धाश्रमात गरजूंना कपड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष कोरपे, प्रदेश संघटन सचिव कृष्णा अंधारे, प्रदेश संघटक मो. रफीक सिद्दीकी, सय्यद युसूफ आली. नगरसेविका उषा विरक, नगरसेवक फैयाज खान, नितीन झापर्डे, अब्दुल रहीम पेंटर, माजी नगरसेविका सुषमा निचळ, माजी गटनेता मनाेज गायकवाड, दिलीप देशमुख, संतोष डाबेराव, नकीर खान, अफसर कुरेशी, याकुब पहेलवान, मंदा देशमुख, सुधीर काहाकर, अशोक परळीकर, शालिनी येउतकर, भारती नीम, देवानंद ताले, बुढन गाडेकर, अजय मते, अब्दुल अनिस, पापाचंद्र पवार, संदीप तायडे, अपूल राठोड, प्रमोद बनसोड, आनंद वानखडे, प्रकाश सोनोने, राहुल इंगोले, शुभम सिरसाट, रवी गीते, विपुल माने, स्वप्नील थोरात, शुभम ढोले, शुभम पिठलोड, वसिम खान, मोहसिन शेख, अमित खांडेकर, सलीम गन्नेवाला, शौकत अली शौकत, के.सी. बागडे, मोहम्मद फिरोज, संज्योती मांगे आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाप्र
दीर्घायुष्यासाठी प्रार्थना
अजित पवार यांच्या दीर्घायुष्यासाठी विविध धार्मिकस्थळी प्रार्थना करण्यात आली. यामध्ये सुषमा निचळ यांच्या वतीने डाॅ. पंदेकृवी येथे जलाभिषेक, आकाश इंगळे यांनी अशोकवाटिका येथे बौद्धवंदना तसेच याकूब पहेलवान यांच्या वतीने मदरशात धर्मगुरूंच्या उपस्थितीत प्रार्थना करण्यात आली.