सरकीला मिळतोय विक्रमी दर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:17 AM2021-04-16T04:17:45+5:302021-04-16T04:17:45+5:30
सरकीचे दर गेल्या वर्षी मार्चमध्ये २ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल होते. सरकीचा साठाही बऱ्यापैकी होता. त्याचा वापर वर्षभरात झाला. ...
सरकीचे दर गेल्या वर्षी मार्चमध्ये २ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल होते. सरकीचा साठाही बऱ्यापैकी होता. त्याचा वापर वर्षभरात झाला.
सरकीची मागणी खाद्यतेलासह कुक्कुट पालनासंबंधीचे खाद्य व इतर बाबींसाठी वाढली आहे. अशातच सोयाबीनचे दर अधिक आहेत. त्याची आयात करावी लागत आहे. कुक्कुट उद्योगात सोयाबीनपासून तयार होणाऱ्या खाद्याची मागणी अधिक असते; परंतु यंदा सोयाबीन कमी उपलब्ध झाले. शिवाय सोयाबीनचे दर सात हजारांच्यावर पोहोचले आहेत. यातच कोविड व इतर समस्यांमुळे कापसाची अधिकाधिक विक्री यंदा फेब्रुवारीपूर्वीच झाली. या दरम्यान कुक्कुट उद्योगाला लागणाऱ्या खाद्यासाठी सरकीचा वापर मोठा झाला. शिवाय खाद्यतेलासाठीदेखील सरकीवर प्रक्रिया वेगात सुरू आहे. यावर्षी बोंडअळी, अतिपावसामुळे कापसाच्या उत्पादनात घट झाली. सरकीचे दर जानेवारीत २,७०० रुपये प्रतिक्विंटल होते. यानंतर सतत दरवाढ झाली. या महिन्यात दर ३,७०० रुपये प्रतिक्विंटल, एवढे झाले आहे. खाद्यतेल उद्योगात सरकीचा वापर यंदा वाढला आहे. ही तेजी पुढील हंगामापर्यंत कायम राहणार असून, सरकीचा साठाही वायदा बाजारात दिसत नसल्याची स्थिती आहे, तसेच ढेपचेही भाव वाढले आहे. मागील वर्षी दोन हजार रुपयांनी मिळणारी ढेप आता २,७५० रुपये प्रति क्विंटल मिळत आहे.
--कोट--
कापसाचे उत्पादन घटल्याने सरकीचे प्रमाण कमी आहे. सद्यस्थितीत सरकीला ३७०० रुपये तर ढेपला २७५० रुपये दर मिळत आहेत. दरात तेजी टिकून राहणार आहे.
अशोक गुप्ता, अध्यक्ष, ऑईल मिल असोसिएशन
--बॉक्स--
सरकीचे मागील भाव
२,५००
सरकीचे आजचे भाव
३,७००
ढेपचे मागील भाव
२,०००
ढेपचे आजचे भाव
२,७५०