पातूर तालुक्यातील सरपंच निवडणुकीचे निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:19 AM2021-04-09T04:19:37+5:302021-04-09T04:19:37+5:30

यामध्ये आलेगाव ग्रामपंचायत येथे सरपंचपदासाठी दोन अर्ज आले होते. गणेश धाईत यांना सहा मते मिळाली, तर गोपाल गणपतराव महल्ले ...

Sarpanch election results announced in Pathur taluka | पातूर तालुक्यातील सरपंच निवडणुकीचे निकाल जाहीर

पातूर तालुक्यातील सरपंच निवडणुकीचे निकाल जाहीर

googlenewsNext

यामध्ये आलेगाव ग्रामपंचायत येथे सरपंचपदासाठी दोन अर्ज आले होते. गणेश धाईत यांना सहा मते मिळाली, तर गोपाल गणपतराव महल्ले यांना ११ मते मिळाली. गोपाल महल्ले यांची आलेगावच्या सरपंचपदी निवड झाली.

चरणगावच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पूजा धनंजय गाडेकर यांनी अर्ज दाखल केला. त्यांना चार मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी उमेदवार सुमित्रा बाळकृष्ण वसतकार यांना पाच मते मिळाली. चरणगाव सरपंचपदी सुमित्रा वसतकार यांची निवड झाली.

यावेळी अध्यासी अधिकारी म्हणून विजय राठोड यांनी काम पाहिले. त्यांना ग्रामसेवक देवकते, तलाठी घाटे यांनी सहकार्य केले. विवरा ग्रामपंचायतच्या सरपंचपदी मंगला माणिक देठे यांची अविरोध निवड झाली. दिग्रस खुर्द ग्रामपंचायत सरपंच निवडणुकीमध्ये अन्नपूर्णा उजाडे यांना तीन मते, तर शशिकला सुरेश महल्ले यांना चार मते मिळाली. चतारी ग्रामपंचायतची निवड प्रक्रिया गुरुवारी होती. परंतु याठिकाणी गणपूर्ती पूर्ण न झाल्यामुळे आयोजित केलेली सभा तहकूब करण्यात आली आहे. तहसीलदार दीपक बाजड, निवडणूक अधिकारी खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सरपंचपदाची निवड प्रक्रिया शांततेत पार पडली.

Web Title: Sarpanch election results announced in Pathur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.