जनुना येथील सरपंच अपात्र घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2017 07:25 PM2017-05-02T19:25:32+5:302017-05-02T19:25:32+5:30

बहिरखेड: नजीकच्या जनुना गट ग्रामपंचायत येथील सरपंच यशोदा किसन पवार यांना शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी विभागीय आयुक्तांनी अपात्र घोषित केले आहे.

Sarpanch of Januna declared ineligible | जनुना येथील सरपंच अपात्र घोषित

जनुना येथील सरपंच अपात्र घोषित

Next

शासकीय जमिनीवर अतिक्रमण; अपर आयुक्तांचा निर्णय

बहिरखेड: नजीकच्या जनुना गट ग्रामपंचायत येथील सरपंच यशोदा किसन पवार यांना शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी विभागीय आयुक्तांनी अपात्र घोषित केले आहे.
जनुना येथील श्रीराम रामजी जाधव यांनी सरपंच यशोदा किसन पवार यांच्याविरुद्ध शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याच्या प्रकरणी ग्रामपंचायत सदस्य पदासाठी अपात्र ठरविण्याकरिता अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रकरण दाखल केले. अपर जिल्हाधिकाऱ्यांनी श्रीराम जाधव यांची सरपंचाविरोधातील तक्रार फेटाळली होती. त्यानंतर श्रीराम जाधव यांनी अपर आयुक्त अमरावती यांच्याकडे अपील दाखल केले होते. सदर अपीलमध्ये अपर आयुक्त अमरावती यांनी तहसीलदार बार्शीटाकळी यांच्याकडून अहवाल मागितला. सदर अहवालामध्ये सरपंच पती किसन रंगलाल पवार यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे अपर आयुक्त अमरावती यांनी सरपंच यशोदा किसन पवार यांना म. ग्रा. पं. कलम १४ (१) ज ३ नुसार यशोदा किसन पवार यांना ग्रामपंचायत सदस्य पदासाठी अपात्र घोषित केले आहे. सदर प्रकरणात श्रीराम जाधव यांच्याकडून अ‍ॅड. अभय थोरात यांनी काम पाहिले.

Web Title: Sarpanch of Januna declared ineligible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.