लोहारी येथील सरपंच अपात्र घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 02:16 AM2017-07-31T02:16:42+5:302017-07-31T02:16:42+5:30
लोहारी : अकोट पंचायत समिती अंतर्गत असलेल्या लोहारी गटग्रामपंचायतच्या सरपंच माया म्हैसने यांना विभागीय आयुक्त अमरावती यांनी पदावरून अपात्र घोषित केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
लोहारी : अकोट पंचायत समिती अंतर्गत असलेल्या लोहारी गटग्रामपंचायतच्या सरपंच माया म्हैसने यांना विभागीय आयुक्त अमरावती यांनी पदावरून अपात्र घोषित केले आहे. चार सदस्य अपात्र झाल्यानंतरही त्यांना मासिक सभेत सहभागी करून घेतल्याचा आरोप सिद्ध झाल्याने त्यांना अपात्र घोषित करण्यात आले.
चिंचखेड (लोहारी) येथील नागरिक प्रदीप सपकाळ यांनी विभागीय आयुक्त अमरावती यांच्या कार्यालयामध्ये लोहारीच्या सरपंच माया अतुल म्हैसने यांना अपात्र घोषित करावे, याबाबत याचिका दाखल केली होती. सदर याचिकेत त्यांनी असे नमूद केले होते की, पूर्वी जात पडताळणी नसल्यामुळे चार सदस्य अपात्र ठरविण्यात आले होते. त्या अपात्र ठरविण्यात आलेल्या सदस्यांसोबत सरपंचांनी मासिक सभा घेतली. त्यावेळी हजेरीपत्रकावर व ठराव रजिस्टरवर अपात्र सदस्यांच्या सह्या घेतल्या होत्या. या कारणावरून सपकाळ यांनी सरपंचांनी पदाचा दुरुपयोग केला असल्यामुळे त्यांना अपात्र करण्यात यावे, असे याचिकेत म्हटले होते. त्यानुसार पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांनी चौकशी केली असता अपात्र झालेल्या सदस्यांच्या उपस्थितीत मासिक सभा घेतली असल्याचे सिद्ध झाले. उपमुख्य कार्यकारी कार्यकारी अधिकाºयांच्या अहवालानुसारच आयुक्तांनी लोहारी येथील सरपंच माया म्हैसने यांना अपात्र ठरविण्याबाबतचा आदेश दिला. अपिलार्थींची बाजू अॅड. अभय थोरात यांनी मांडली.