१३ ग्रामपंचायतींचे सरपंच अविरोध; चार गावांत मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:18 AM2021-02-10T04:18:41+5:302021-02-10T04:18:41+5:30

यात खंडाळा सरपंचपदी हेमलता किशोर मुंदडा, उपसरपंचपदी सिंधूताई गजानन वानखडे यांची अविरोध निवड झाली. कार्ला बु. सरपंचपदी नंदलाल कृष्णराव ...

Sarpanch opposition of 13 gram panchayats; Voting in four villages | १३ ग्रामपंचायतींचे सरपंच अविरोध; चार गावांत मतदान

१३ ग्रामपंचायतींचे सरपंच अविरोध; चार गावांत मतदान

Next

यात खंडाळा सरपंचपदी हेमलता किशोर मुंदडा, उपसरपंचपदी सिंधूताई गजानन वानखडे यांची अविरोध निवड झाली. कार्ला बु. सरपंचपदी नंदलाल कृष्णराव भराटे, उपसरपंचपदी जयानंद भगवान बोदडे ह्या सहाविरुद्ध तीन मतांनी विजयी झाल्या. चांगलवाडी येथे अनुसूचित जमातीकरिता सरपंचपद राखीव असल्याने व उमेदवार नसल्यामुळे उपसरपंचपदी यशोदाबाई श्रीराम कडू यांची अविरोध निवड झाली. रायखेड सरपंचपदी स्वाती नीलेश नेमाडे, उपसरपंचपदी जया नागोराव साबळे यांची अविरोध निवड झाली. हिंगणी बु. सरपंचपदी सविता संदीप मांडवकार, उपसरपंचपदी सचिन गजानन कोरडे यांची अविरोध, गोर्धा सरपंचपदी अमृता लक्ष्मण थोरात, उपसरपंचपदी बाहोद्दीन इनामदार अविरोध, राणेगाव सरपंचपदी पद्मा गजानन कुकडे, उपसरपंचपदी दीपक समाधान कुकडे यांची अविरोध निवड झाली. वडगाव रोठे सरपंचपदी दीपाली विष्णू रोठे, उपसरपंचपदी विनोद रमेश अढाऊ अविरोध, जस्तगाव सरपंचपदी ज्योतीताई विलास जवंजाळ, उपसरपंचपदी आरती सुरेंद्र खर्चे अविरोध, अटकळी अविरोध सरपंचपदी गीता शरद दारोकार उपसरपंचपदी अशोक बळीराम दारोकार यांची अविरोध निवड झाली. थार सरपंचपदी कपिल रवींद्र फोकमारे, उपसरपंचपदी सुषमा नीळकंठ फोकमारे यांनी चार विरुद्ध तीन मतांनी बाजी मारली. तुदगाव सरपंचपदी संघर्ष रामराव वानखडे, उपसरपंचपदी कविता शुद्धोधन वानखडे हे चारविरुद्ध ३ मतांनी विजयी झाले. नेर सरपंचपदी जयश्री नीळकंठ दोड या चार विरुद्ध तीन मतांनी विजयी झाल्या. उपसरपंचपदी अर्जुन सदाशिव चौके यांची अविरोध निवड झाली. पिवंदळ सरपंचपदी प्रशांत जगदेवराव मेहंगे, उपसरपंचपदी जिजाबाई जयकुमार बोर्डे अविरोध, वाकोडी सरपंचपदी सुनीता विनोद गव्हांदे, उपसरपंचपदी सुनंदा अशोक टेकाडे अविरोध, इसापूर सरपंचपदी मीरा आनंद बोदडे, उपसरपंचपदी महादेव लक्ष्मण नागे अविरोध, वांगरगाव सरपंचपद अनुसूचित जमाती महिलांकरिता राखीव असल्याने व उमेदवार नसल्यामुळे उपसरपंचपदी वैशाली सुधीर मार्के अविरोध निवडून आल्या. निवडणूक प्रक्रियेवर तहसीलदार राजेश गुरव व ठाणेदार दिनेश शेळके लक्ष ठेवून होते. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. सर्व प्रक्रिया शांततेत पार पडली.

१७ पैकी १२ गावे महिलांच्या ताब्यात

१२ ग्रामपंचायतींचा कारभार महिलांच्या हाती आला आहे. केवळ पाच ग्रामपंचायतींमध्ये पुरुष सरपंचपदी विराजमान झाले आहेत. तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये महिलाराज आले असले तरी, त्या स्वत: कारभार हाकतात की, त्यांचे पतीराज हे पाहतात. याकडे ग्रामस्थांचे लक्ष राहणार आहे.

Web Title: Sarpanch opposition of 13 gram panchayats; Voting in four villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.