लॉकडाऊनमध्ये गरजूंना मदत करणाऱ्या सरपंच स्नेहल ताले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:18 AM2021-03-08T04:18:46+5:302021-03-08T04:18:46+5:30
दिग्रस बु : काेराेना प्रतिबंधासाठी लाॅकडाऊन सुरू झाल्यानंंतर अनेकांचे राेजगार गेले, हातावर पाेट असणाऱ्या मजुरांचे हाल झाले... अशाच प्रकारे ...
दिग्रस बु : काेराेना प्रतिबंधासाठी लाॅकडाऊन सुरू झाल्यानंंतर अनेकांचे राेजगार गेले, हातावर पाेट असणाऱ्या मजुरांचे हाल झाले... अशाच प्रकारे भूमिहीन मजूर, गरजवंतांच्या मदतीला सायवणी येथील महिला सरपंच स्नेहल धनंजय ताले या धावून आल्या. काेराेना संकटाच्या काळात भूमिहीन मजुरांना व गरजू व्यक्तींना स्वखर्चातून त्यांनी अन्नधान्य व किराणा मोफत दिला.
पातूर तालुक्यातील सायवणी गाव विविध समस्यांच्या विळख्यात सापडलेल्या गावात दूषित पाण्यामुळे किडनीच्या आजाराने अनेक जण ग्रस्त झाले हाेते. त्यावेळी गावातून किडनीग्रस्त आजाराचा नायनाट करण्यासाठी त्यांनी जवळच असलेल्या मळसूर या गावातून स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पुढाकार घेतला. महिला म्हणून सरपंच पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर गावाचा कारभार सरपंच पती पाहतो; परंतु यामध्ये येथील सरपंच महिला यांनी स्वतः सर्व जबाबदारी हाती घेऊन कामे मार्गी लावली. गावाच्या विकासासाठी वृक्ष लागवड, गावातील अंर्तगत रस्ते, बचत गट आदी उपाययोजना करण्यात आल्या. दोन फीडर चालतील एवढा सौर ऊर्जा प्लांट तयार केला, जेणेकरून शेतकऱ्यांना व सामान्य जनतेला विजेचा त्रास होणारी याची खबरदारी घेतली. सौर-ऊर्जा दिवे, स्ट्रीट लाइट, घरकुल योजना, शौचालय बांधकाम, स्मशानभूमी शेड, रोजगार हमी योजनेची कामे, वैयक्तिक लाभाच्या योजना अशी बरेच काही विकासात्मक कामे खेचून आणली आहेत. स्वकर्तृत्वाने ओळख निर्माण करून सरपंच स्नेहल ताले यांनी इतरांसमाेर आदर्श निर्माण केला आहे. कोरोना काळात आरोग्य विभागाला वेळोवेळी बोलावून कोरोनापासून गावास दूर ठेवले. काटेकोरपणे नियम पाळले गेले.
------------
सरपंच असताना पतीची मिळालेली लाखमोलाची साथ कसलाच हस्तक्षेप न करता मला काम करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळाले. कितीही अवघड काम आले तरी तुझे तुलाच करावे लागेल; पण त्यासाठी प्रोत्साहन मात्र जरूर दिले. कोणी महिला पदावर असेल त्यांनी स्वत: आपली जबाबदारी सांभाळावी.
-स्नेहल धनंजय ताले, सरपंच, सायवणी
...................