विनोबा भावे जयंतीनिमित्त सर्वोदय मंडळाची सर्वधर्म प्रार्थना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:23 AM2021-09-12T04:23:02+5:302021-09-12T04:23:02+5:30
सर्वोदय मंडळाचे जिल्हाध्यक्ष बबनराव कानकिरड यांनी प्रास्ताविक केले. कापूस ते कापड अभियान प्रमुख प्रल्हादराव नेमाडे यांनी खादी वस्त्र स्वावलंबनावर ...
सर्वोदय मंडळाचे जिल्हाध्यक्ष बबनराव कानकिरड यांनी प्रास्ताविक केले. कापूस ते कापड अभियान प्रमुख प्रल्हादराव नेमाडे यांनी खादी वस्त्र स्वावलंबनावर मनोगत व्यक्त केले. भूदान मंडळाचे माजी सदस्य वसंतराव केदार यांनी प्रत्येक सर्वोदयी कार्यकर्त्यांनी चरखा प्रशिक्षण पूर्ण करण्याचे आवाहन केले. शेतजमिनीवर मर्यादा आणली तशी शहरी मालमत्तेवर सिलिंग आणली तरच सामाजिक संतुलन होईल, असा आशावाद महादेवराव भुईभार यांनी अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केला. सर्वोदय मंडळाचे अकोट तालुका संयोजक जयप्रकाश वाकोडे, वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज निसर्गोपचार संस्थेचे अध्यक्ष गोवर्धनदादा खवले, ज्येष्ठ सर्वोदयी रामदास शेळके, नितीन भरणे (केळीवेळी), किशोरकुमार मिश्रा (रोहना) यांनी सर्वधर्म प्रार्थनेवर उद्बोधन केले. सर्वधर्म प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे संचालन डाॅ. मिलिंद निवाणे यांनी केले. आभार प्रदर्शन आकाश इंगळे यांनी केले.