पीक कर्ज वाटपात ‘डिजिटल’ स्वाक्षरीचा ‘सातबारा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 10:30 AM2020-04-22T10:30:15+5:302020-04-22T10:30:37+5:30

डिजिटल ह्य स्वाक्षरीचा सात -बारा व ८-अ चा वापर करण्याचा आदेश अकोल्याचे तहसीलदार विजय लोखंडे यांनी २० एप्रिल रोजी दिला.

'Satbara' of 'digital' signature in crop loan distribution | पीक कर्ज वाटपात ‘डिजिटल’ स्वाक्षरीचा ‘सातबारा’

पीक कर्ज वाटपात ‘डिजिटल’ स्वाक्षरीचा ‘सातबारा’

googlenewsNext

- संतोष येलकर 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : पीक कर्जाचे वाटप सुरू करण्यात आले असून, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पीक कर्जाचे वाटप करताना तलाठ्यांच्या स्वाक्षरीचा ह्यसात-बारा ह्य व ८-अ चा आग्रह न धरता  डिजिटल ह्य स्वाक्षरीचा सात -बारा व ८-अ चा वापर करण्याचा आदेश अकोल्याचे तहसीलदार विजय लोखंडे यांनी २० एप्रिल रोजी दिला.
यावर्षीच्या खरीप हंगामासाठी पीक कर्जाचे वाटप बँका व सेवा सहकारी सोसायट्यामार्फत सुरू करण्यात आले आहे.
या पृष्ठभूमिवर कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राष्ट्रीयीकृत बँका व सेवा सहकारी सोसायट्यांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करताना, तलाठ्यांच्या स्वाक्षरीचे सात-बारा आणि ८-अ चा आग्रह न धरता, डिजिटल स्वाक्षरीचा सात-बारा आणि ८-अ चा वापर करावा, असा आदेश अकोल्याचे तहसीलदार विजय लोखंडे यांनी बँकांसह सेवा सहकारी सोसायट्यांना दिला. '


नवीन फेरफार दाखल्याची मागणी करू नका!
शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करताना नवीन फेरफार दाखल्याची मागणी करण्यात येऊ नये, शेतकºयांकडे उपलब्ध फेरफार नोंदीच्या प्रतीची पाहणी करून आणि सात-बाराशी ताळमेळ घेऊन, तीच प्रत ग्राह््यह्ण धरण्यात यावी, असे निर्देश तहसीलदारांनी दिले आहेत.


शेतकºयांना पीक कर्ज वाटप करताना बँका व सेवा सहकारी सोसायट्यांनी लाखांच्या स्वाक्षरीचे सात-बारा आणि ८-अ चा आग्रह न धरता, डिजिटल स्वाक्षरीचा सात-बारा व ८- अ चा वापर करावा, असे आदेश देण्यात आले आहेत.
- विजय लोखंडे, तहसीलदार, अकोला.

Web Title: 'Satbara' of 'digital' signature in crop loan distribution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.