सतीष कुलकर्णी यांनी स्वीकारला ‘डीवायएसपीं’चा पदभार; शहराच्या मध्यवर्ती भागातील अवैध धंदे माेडीत काढण्याचे आव्हान

By आशीष गावंडे | Published: January 29, 2024 09:52 PM2024-01-29T21:52:35+5:302024-01-29T21:54:19+5:30

शहर पाेलीस उपअधीक्षक सुभाष दूधगावकर यांची बदली झाल्यामुळे त्यांच्या रिक्त जागेवर सतीश संजयराव कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Satish Kulkarni took charge of 'DYSP'; | सतीष कुलकर्णी यांनी स्वीकारला ‘डीवायएसपीं’चा पदभार; शहराच्या मध्यवर्ती भागातील अवैध धंदे माेडीत काढण्याचे आव्हान

सतीष कुलकर्णी यांनी स्वीकारला ‘डीवायएसपीं’चा पदभार; शहराच्या मध्यवर्ती भागातील अवैध धंदे माेडीत काढण्याचे आव्हान

आशिष गावंडे/अकोला

अकोला: शहर पाेलीस उपअधीक्षक सुभाष दूधगावकर यांची बदली झाल्यामुळे त्यांच्या रिक्त जागेवर सतीश संजयराव कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. साेमवारी सतीष कुलकर्णी यांनी ‘डीवायएसपी’पदाचा पदभार स्वीकारला. दरम्यान, शहराच्या मध्यवर्ती भागातील अवैध धंदे ‘डीवायएसपी’कुलकर्णी कसे माेडीत काढतात,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

राज्याच्या गृहविभागाने २८ जानेवारी राेजी अकोल्याचे शहर पाेलीस उपअधीक्षक सुभाष दूधगावकर यांच्या बदलीचा आदेश जारी केला. त्यांच्या पदस्थापनेचा आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार असल्याचे गृह विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दुधगावकर यांची बदली झाल्यामुळे रिक्त पदावर सतीष कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली. साेमवारी कुलकर्णी यांनी ‘डीवायएसपी’पदाचा पदभार स्वीकारला. अमरावती परिक्षेत्रामध्ये अकोल्यातून बदली झालेले पोलिस निरीक्षक महेंद्र कदम यांची पिंपरी चिंचवड येथे बदली करण्यात आली आहे. या शिवाय खदान पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक धनंजय सायरे यांची ‘डीवायएसपी’पदी पदाेन्नती झाली आहे.

Web Title: Satish Kulkarni took charge of 'DYSP';

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.