कौलखेड येथील नवरात्र महोत्सवात सत्यपाल महाराजांनी केले प्रबोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 05:35 PM2018-10-13T17:35:02+5:302018-10-13T17:36:21+5:30
आई भवानी दुर्गा उत्सव मंडळाच्या कार्यक्रमात प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी खास लकबीच्या कीर्तनात मनोरंजनात्मक प्रबोधन करून रसिकांना हसवून जीवनाची वास्तविकता दाखविली.
अकोला : कौलखेड परिसरातील गजानन महाराज मंदिर परिसरात नवरात्रोत्सवानिमित्त मनोरंजन व प्रबोधनाचे हक्काचे स्थळ ठरलेल्या शिवशक्ती प्रतिष्ठानच्या आई भवानी दुर्गा उत्सव मंडळाच्या कार्यक्रमात प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी खास लकबीच्या कीर्तनात मनोरंजनात्मक प्रबोधन करून रसिकांना हसवून जीवनाची वास्तविकता दाखविली.
या पंचम दिवसीय विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचा प्रारंभ गुरुवारी मंडळाचे मार्गदर्शक, माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, माजी आ. तुकाराम बिडकर, श्रीकांत पिसे, डॉ. संतोष कोरपे, डॉ. आशा मिरगे, प्रा. विजय उजवणे, शिवाजी म्हैसने, दिलीप आसरे, डुकरे महाराज, आयोजन समितीचे अध्यक्ष संग्राम गावंडे, माजी नगरसेवक पंकज गावंडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. गजानन महाराज मंदिर परिसरात आयोजित या महोत्सवात यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत दोनशे भाग्यवंतांसाठी ‘लकी ड्रॉ’ची सोडत काढण्यात आली. यामध्ये जगाभाऊ गावंडे, अमित भवाने, स्नेहल राठोड, शबाना पटेल, वैशाली अंधारे, जनार्धन साबळे, रूपाली पंडित, वैशाली केसरे, रुचिता गोळे, सुरेखा पागृत, पायल डागवार, अमित गावंडे, आराध्य वाघमारे, दीपाली कावरे, रोशनी कदम या भाग्यवंतांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे स्वागताध्यक्ष युवराज गावंडे, अभिजित शिंदे, विशाल गावंडे, किशोर राजूरकर, उमेश गावंडे, शरद सरप, रोहित ठाकरे, सुनील नागझरे, संदीप मार्के, अर्जुन दोड, दादू पावसाळे, विवेक गावंडे, विक्की जाधव, विक्की नागे, छोटू ठाकरे, प्रवीण कुचार, सागर मुठाव, गोविंद खराडे, विवेक मुंगारे, शुभम राऊत, विनोद बोरकर, सागर चांभारे, प्रवीण साबळे, किशोर निमकंडे, तेजस धारणे व सुधाकर नानोटे यांनी प्रयत्न केले.