राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सत्यपाल महाराज यांची निवड

By Atul.jaiswal | Published: October 23, 2017 01:50 PM2017-10-23T13:50:36+5:302017-10-23T13:54:42+5:30

अकोला : पाचवे राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी विचार साहित्य संमेलन अकोला येथील स्वराज्य भवन येथे संपन्न होणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ प्रबोधनकार, सप्तखंजेरीवादक श्री सत्यपाल महाराज यांची निवड करण्यात आली आहे

Satyapal Maharaj elected president of cultural event at akola | राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सत्यपाल महाराज यांची निवड

राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सत्यपाल महाराज यांची निवड

googlenewsNext
ठळक मुद्दे२५,२६ नोव्हेंबर २०१७ रोजी होणार संमेलन



अकोला : पाचवे राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी विचार साहित्य संमेलन अकोला येथील स्वराज्य भवन येथे संपन्न होणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ प्रबोधनकार, सप्तखंजेरीवादक श्री सत्यपाल महाराज यांची निवड करण्यात आली आहे. आयोजन समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत सत्यपाल महाराज यांचा संमेलनाध्यक्षपदी निवड करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला व तो सर्वानुमतीने मंजूर झाला.
गेल्या पाच वर्षांपासून अकोला महानगरामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार प्रेमी एकत्र येऊन या संमेलनाचे थाटात आयोजन करीत असतात. मागील वर्षी भारतीय वीर जवानांना समर्पित चौथे संमेलन संपन्न झाले होते. यावेळी पाचवे संमेलन जगाचा पोशिंदा बळीराजाला समर्पित राहणार असून, राज्याच्या विविध भागांमधील संत साहित्यिक, ज्येष्ठ विचारवंत, लेखक, समीक्षक, कवि, नाय्यवंत कलाकार यांची मांदियाळी राहणार आहे.
संमेलनाचे पूर्व नियोजन म्हणून जिल्ह्यातील सातही तालुक्यांमध्ये बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. हे राज्यस्तरीय संमेलन यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील गुरुदेव सेवक झटत असून, नागरिकांनीही सहकार्य करावे असे आवाहन आयोजन समितीच्यावतीन करण्यात आले आहे. अध्यक्ष निवडीच्या बैठकीला रामेश्वर बरगट, डॉ. प्रकाश मानकर, अ‍ॅड. संतोष भोरे, प्रा. डॉ. राजीव बोरकर, गोपाल गाडगे, श्रीपाद खेडकर, गणेश पोटे, धनंजय मिश्रा, संजय चौधरी, प्रा. हरीदास गहुकर, भाऊराव राऊत, डॉ. गजानन नारे यांच्यासह इतर पदाधिकाºयांची उपस्थिती होती.

Web Title: Satyapal Maharaj elected president of cultural event at akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.