सौरभ कटियार अकोला जिल्हा परिषदेचे नवे 'सीईओ'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 08:00 PM2020-07-14T20:00:21+5:302020-07-14T20:00:31+5:30
भारतीय प्रशासन सेवेतील (भाप्रसे) २०१६ च्या तुकडीतील अधिकारी असलेले सौरभ कटियार जिल्हा परिषदेचे नवे ‘सीईओ’ म्हणून येत आहेत.
अकोला : जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी सौरभ कटियार यांची मंगळवारी शासनामार्फत नियुक्ती करण्यात आली.
सहा महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची गत २३ जानेवारी २०२० रोजी शासनामार्फत बदली करण्यात आली. त्यामुळे रिक्त असलेल्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार सांभाळत आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून रिक्त असलेल्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सौरभ यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचा आदेश शासनामार्फत १४ जुलै रोजी देण्यात आला. त्यानुसार जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सौरभ कटियार अकोला जिल्हा परिषदेत लवकरच रुजू होणार आहेत. भारतीय प्रशासन सेवेतील (भाप्रसे) २०१६ च्या तुकडीतील अधिकारी असलेले सौरभ कटियार जिल्हा परिषदेचे नवे ‘सीईओ’ म्हणून येत आहेत.