भाविकांच्या सुविधेसाठी निधी कमी पडू देणार नाही - सावरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 02:12 AM2018-02-14T02:12:27+5:302018-02-14T02:13:08+5:30
चोहोट्टा बाजार : भाविकांचे श्रद्धास्थान व काशी विश्वेश्वरांचे स्वयंभू लिंग असलेल्या तीर्थक्षेत्र पानेट येथे येणार्या भाविकांच्या सुविधेसाठी निधी कमी पडू देणार नाही आणि पानेट संस्थानच्या विकासासाठी २ कोटी १३ लाख रुपयांचा विकास आराखडा तयार असून, निधी मंजूर व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहितीसुद्धा आमदार रणधीर सावरकर यांनी पानेट येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना दिली.

महाशिवरात्रीनिमित्त ब्रह्मचारी महाराज संस्थान व गोरक्षण समिती पानेटच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी आमदार सावरकर यांच्या हस्ते स्वयंभू लिंगाचे पूजन करून भाविकांना महाप्रसाद वितरित करण्यात आला. संस्थानच्यावतीने आमदार सावरकर यांचा सदाशिवराव ठाकरे, अध्यक्ष मनीष मोडक यांनी सत्कार केला. या प्रसंगी राजेश नागमते, संजय मसने, दिनकर गावंडे, विवेक भरणे, मधुकर पाटकर, विजय जवंजाळ, दत्ता गावंडे, दिलीप सुलताने, हर्षल ठाकरे, भूषण मोडक व ब्रह्मचारी महाराज संस्थान व गोरक्षण समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.