बचपन बचाओ संघटनेने दिले धरणे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:22 AM2021-01-16T04:22:05+5:302021-01-16T04:22:05+5:30

अकोला : शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांत स्वतंत्र शेतकरी वसतिगृह सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी बचपन बचाओ संघटनेच्यावतीने शुक्रवारी ...

Save the Childhood! | बचपन बचाओ संघटनेने दिले धरणे!

बचपन बचाओ संघटनेने दिले धरणे!

Next

अकोला : शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांत स्वतंत्र शेतकरी वसतिगृह सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी बचपन बचाओ संघटनेच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले.

शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना शिक्षण घेता यावे, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शेतकरी पाल्य विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शेतकरी वसतिगृह सुरू करण्याच्या मागणीसाठी बचपन बचाओ संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आले. मागणीची दखल घेऊन शेतकरी मुला-मुलींना दिलासा द्यावा, अन्यथा राज्यभर आांदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही संघटनेच्यावतीने निवदेनात देण्यात आला आहे. या धरणे आंदोलनात बचपन बचाओ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाळू ढोले-पाटील यांच्यासह गजानन हरणे, डाॅ.अशोक ओळंबे, गोपाल नागपुरे, आशुतोष काटे, संतोष इंगोले, गजानन इचे, गणेश चोंडेकर, विजय भटकर, संजय तिकांडे, मंगलसिंग ठाकूर, छाया ठाकूर, रत्नमाला ढोले, पूर्वा ढोले आदी सहभागी झाले होते.

..............................फोटो..............

Web Title: Save the Childhood!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.