‘ज्योतिर्लिंग निसर्ग मंदिर वाचवा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:18 AM2021-03-25T04:18:32+5:302021-03-25T04:18:32+5:30
अकोला : पातूर तालुक्यातील शिर्ला अंधारे येथील विश्वातील आदी स्वयंभू तेरा ज्योतिर्लिंग निसर्ग मंदिर अखंड खडकापासून बनलेले आहे. मंदिराजवळील ...
अकोला : पातूर तालुक्यातील शिर्ला अंधारे येथील विश्वातील आदी स्वयंभू तेरा ज्योतिर्लिंग निसर्ग मंदिर अखंड खडकापासून बनलेले आहे. मंदिराजवळील अकोला-वाशीम महामार्गाचे काम सुरू असून नालीच्या कामामध्ये दोन शिवलिंग येत आहेत. नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन ज्योतिर्लिंग वाचवावे अशी मागणी शंकरराव सांगळे, संजय लाड, बाळासाहेब पांडे, संतोष चऱ्हाटे, हरीश अग्रवाल यांनी जिल्हाधिकाऱ्यांना २३ मार्च रोजी निवेदनाव्दारे केली आहे.
--------------------------------------------------------
परमबीरसिंग प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी
अकोला : पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत १०० कोटी रुपयांच्या वसुलीविषयी मुख्यमंत्र्यांना स्वाक्षरी नसलेले पत्र दिले. हा गृहमंंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न असून या प्रकरणाची उच्चपदस्थ न्यायाधीश किंवा तत्सम पोलीस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पश्चिम विधानसभा अध्यक्ष मोहम्मद फजलू अब्दुल करीम यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनाव्दारे केली.
-------------------------------------------------------
चार दिवस बँका बंद
अकोला : मार्च अखेरमुळे बँकांमध्ये आर्थिक ताळेबंद तयार करण्याची घाई सुरू आहे. पेन्शन, निराधार योजनेचे मानधन आदींमुळे आता बँकांमध्ये गर्दी वाढत आहे. बँकांतील आर्थिक व्यवहार पूर्ण करायचे असल्यास ते २६ मार्चपर्यंत करणे आवश्यक होऊन बसले आहे. त्यानंतर चार दिवस बँकांना सुट्या राहणार आहेत. २७, २८, २९ व ३१ या तारखेला बँका बंद असल्याने दोन दिवसात सर्व कामे पूर्ण करावी लागणार आहे.