कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या गुरांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:14 AM2021-07-01T04:14:40+5:302021-07-01T04:14:40+5:30

मालवाहू वाहनामध्ये आरोपी अरशद खान आबीत खान वय (२०), शे. लुकमान शे. अजीम (१९) हे दोघे दोन बैलांना ...

Save the lives of cattle being taken for slaughter | कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या गुरांना जीवदान

कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या गुरांना जीवदान

Next

मालवाहू वाहनामध्ये आरोपी अरशद खान आबीत खान वय (२०), शे. लुकमान शे. अजीम (१९) हे दोघे दोन बैलांना निर्दयपणे कोंबून विनापरवाना अवैधरित्या कत्तल करण्याच्या उद्देशाने घेऊन जात होते. पोलिसांनी वाहन थांबवून त्यांना कागदपत्रांची विचारणा केली. परंतु त्यांच्याकडे कागदपत्रे आढळली नाहीत. त्यामुळे पोलिसांनी दोन बैलासह वाहन असा एकूण ३ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. दहीहांडा पोलिसांनी बैलांना ताब्यात घेऊन संगोपनासाठी गोरक्षण संस्थेत पाठविले. ही कारवाई दहीहांडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय संभाजी रघुनाथ हिवाळे, शेखर खोदरे, नीलेश देशमुख, यादव यांनी केली. आरोपींविरुद्ध प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. आरोपींची न्यायालयाने कारागृहात रवानगी केली.

Web Title: Save the lives of cattle being taken for slaughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.