'सेव्ह मेरिट - सेव्ह नेशन’चे पालकमंत्र्यांच्या घरासमोर ‘थाळी बजाओ’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 02:36 PM2019-07-13T14:36:03+5:302019-07-13T14:40:52+5:30

अतिरिक्त आरक्षण रद्द करण्यात यावे या आशयाची मागणी घेऊन ‘सेव्ह मेरीट सेव्ह नेशन’ मोर्चाच्या वतीने पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या घरासमोर शनिवारी सकाळी थाळी बजाओ आंदोलन करण्यात आले.

'Save Merit - Save Nation' agitation infront of Guardian minister's Home | 'सेव्ह मेरिट - सेव्ह नेशन’चे पालकमंत्र्यांच्या घरासमोर ‘थाळी बजाओ’ आंदोलन

'सेव्ह मेरिट - सेव्ह नेशन’चे पालकमंत्र्यांच्या घरासमोर ‘थाळी बजाओ’ आंदोलन

Next
ठळक मुद्दे ‘सेव्ह मेरीट सेव्ह नेशन’ च्या वतीने पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांना निवेदन देण्यात आले.गुणी व हुशार विद्याथ्यार्ची या आरक्षणा मुळे गळचेपी होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.उपस्थित नागरिक व वैद्यकीय क्षेत्रातील नागरिकांनी ‘सेव्ह मेरीट सेव्ह नेशन’ च्या घोषणा दिल्या.

अकोला : राज्य घटनेत आरक्षणाची मयार्दा ५० टक्के ठरवून देण्यात आली असतानाही भाजपप्रणित राज्य शासनाने संविधानाने दिलेल्या पळवाटांचा वापर करत नैतिकतेला हरताळ फासून हे आरक्षण ७५ टक्क्यांपर्यंत नेले आहे. या आरक्षणामुळे खुल्या प्रवगार्तील गुणवंत व हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून हे अतिरिक्त आरक्षण रद्द करण्यात यावे या आशयाची मागणी घेऊन ‘सेव्ह मेरीट सेव्ह नेशन’ मोर्चाच्या वतीने पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या घरासमोर शनिवारी सकाळी थाळी बजाओ आंदोलन करण्यात आले.
या थाळी बजावं आंदोलनात शहरातील डॉक्टर्स ,व्यवसायिक व अनेक संस्थांचे पदाधिकारी, नागरिक महिला पुरुष सहभागी झाले होते. या वेळी ‘सेव्ह मेरीट सेव्ह नेशन’ च्या वतीने पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांना निवेदन देण्यात आले. राज्य शासनाच्या या अतिरिक्त आरक्षणामुळे गुणवत्ताधारक खुल्या विद्यार्थ्यांची गळचेपी होत असून छतीस हजार मेरिट लिस्ट नंबर असणाऱ्या विद्यार्थ्याला आरक्षणातून क२ेएम मुंबई सारख्या नामवंत महाविद्यालयात अस्थिव्यंग या नामांकित कोर्सला प्रवेश मिळाला. तर चार हजार मेरिट लिस्ट क्रमांक असणाº्या खुल्या कॅटेगिरी च्या विद्यार्थ्यांना कोणतीही जागा या मध्ये मिळत नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला. गुणी व हुशार विद्याथ्यार्ची या आरक्षणा मुळे गळचेपी होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिक व वैद्यकीय क्षेत्रातील नागरिकांनी ‘सेव्ह मेरीट सेव्ह नेशन’ च्या घोषणा दिल्या. या अतिरिक्त आरक्षण संदर्भात रस्त्यावर जनजागरण करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

Web Title: 'Save Merit - Save Nation' agitation infront of Guardian minister's Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.