शाळा, वाचवा अन् आम्हाला फक्त शिकवू द्या...! शिक्षण समन्वय समितीचा मोर्चा
By नितिन गव्हाळे | Published: October 7, 2023 04:52 PM2023-10-07T16:52:40+5:302023-10-07T16:54:18+5:30
जिल्हाभरातून ६ हजारांवर शिक्षक मोर्चामध्ये सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना शिक्षण समन्वय समितीच्यावतीने निवेदन देण्यात आले.
अकोला: शासन शिक्षणाचे बाजारीकरण करीत असून शिक्षकांवर अनेक अशैक्षणिक कामे लादण्यासोबतच जि.प., मनपा शाळांचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच अनेक चुकीचे नवनवीन शैक्षणिक अध्यादेश काढून शासन शिक्षकांचे खच्चीकरण करीत आहे. शासनाने शाळा टिकवाव्यात आणि शिक्षकांना शिकवू द्यावे. यासह इतर मागण्यासाठी ७ ऑक्टोबर दुपारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. जिल्हाभरातून ६ हजारांवर शिक्षक मोर्चामध्ये सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना शिक्षण समन्वय समितीच्यावतीने निवेदन देण्यात आले.
मोर्चामध्ये शिक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष शत्रुघ्न बिरकड, जिल्हा शिक्षण संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष विजय कौसल, माजी आमदार हरिदास भदे, सचिव ॲड. विलास वखरे, पुष्पा गुलवाडे, जिल्हा समन्वय समिती सचिव डॉ. अविनाश बोर्डे, कार्याध्यक्ष विजय ठोकळ , शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष प्राचार्य गजेंद्र काळे, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष बळीराम झामरे, दीपक बिरकड, शिक्षण संस्थाचालक संघटनेचे उपाध्यक्ष सचिन जोशी, जि.प. प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष शशिकांत गायकवाड, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष देवानंद मोरे, सतीश वरोकार, मारोती वरोकार, प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख, विजय टोहरे, शिक्षक समितीचे कार्याध्यक्ष किशोर कोल्हे, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष राहुल रोकडे, शिक्षक प्रतिनिधी सभेचे जिल्हाध्यक्ष शंकर डाबेराव, सुरेश बंड, शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष नितीन बंडावार, प्रा. संतोष वाघ, माधव मुन्शी, आनंद साधू, प्रा. डॉ. रविंद्र भास्कर, उर्दू संघटनेचे साबिर कलाम फैयाज खान, अभिजीत कौसल, शिक्षक परिषदेचे अतुल पिलात्रे, जिल्हाध्यक्ष गजानन जायभाये, विमाशिसंचे कार्यवाह नितीन गायकवाड, प्रवीण लाजूरकर, शंतनु मोहोड, राजकुमार वानखडे, दिनेश तायडे, गजानन जायभाये, डॉ. शाहिद इकबाल, मो. अजरोद्दीन, अमर भागवत, विष्णू झामरे, आर. के. देशमुख, संजय बर्डे, संजय इंगळे, रजनीश ठाकरे, साने गुरुजी संघटनेचे केशव मालोकार, अंधारे, गोसावी, मंगेश टिकार, विलास मोरे, शंकर तायडे, प्रकाश चतरकार, संजय भाकरे, मनीष गावंडे, डॉ. सौरभ म्हात्रे, राहुल महाजन, शारीरिक शिक्षक संघटनेचे प्रदीप थोरात, श्रीराम पालकर, प्रवीण ढोणे, संतोष अहिर,मेस्टाचे अविनाश गावंडे या प्रमुख शिक्षक नेत्यांसह जिल्हाभरातून शिक्षक सहभागी झाले होते.
काय आहेत, शिक्षकांच्या मागण्या
निवेदनात शासनाने शाळा भांडवलदार व देणगीदारांच्या दावणीला बांधून बाहेरील स्त्रोतांच्या द्वारे भरती करू नये कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करणे जिल्ह्यातील अंशतः अनुदानित शाळांना १०० टक्के अनुदान देणे शाळातील शिक्षकांना शिक्षणा व्यतिरिक्त कोणते काम देण्यात येऊ नये राज्यातील नव्याने अनुदानित राज्य कर्मचाऱ्याप्रमाणे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १०,२०,३० वर्षाची आश्वासित प्रगती योजना लागू करणे इत्यादी महत्त्वपूर्ण मागण्या केल्या आहेत.
मोर्चा या शिक्षक संघटनांचा सहभाग
शिक्षणाच्या बाजारीकरणाच्या विरोधातील माेर्चामध्ये शिक्षण संस्थाचालक संघटना, मुख्याध्यापक संघ, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, विज्युक्टा, प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र बहुजन शिक्षक संघ, कास्ट्राईब शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, प्रहार शिक्षक संघटना, शिक्षक प्रतिनिधी सभा, महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटना, उर्दू शिक्षक संघटना, विज्ञान अध्यापक मंडळ, उच्च माध्यमिक शिक्षक संघटना यासह शिक्षकेतर कर्मचारी संघटना सहभागी झाल्या होत्या.
जुनी पेन्शन, अनुदानासाठी शिक्षक आक्रमक
शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करावी, अंशत: अनुदानित शाळांना १०० टक्के अनुदान द्यावे, शाळा भांडवलदार व देणगीदारांच्या दावणीला बांधू नका, शाळा, शिक्षक आणि शिक्षणाचे बाजारीकरण करू नका. आदी घोषणा देत, शिक्षक आक्रमक झाले होते.