अनुभव शिक्षा केंद्रात सावित्रीबाई फुले जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:55 AM2021-01-08T04:55:48+5:302021-01-08T04:55:48+5:30
राष्ट्रवादी पदवीधर संघाकडून अभिवादन अकाेला : राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या वतीने सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी पदवीधर ...
राष्ट्रवादी पदवीधर संघाकडून अभिवादन
अकाेला : राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या वतीने सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी पदवीधर संघाचे जिल्हाध्यक्ष राहूल इंगाेल, सूरज मेंगे,आशिष गावकर, अमित उके, आनंद इंगळे, शिवाजी चाैकने, कुलदीप चाैरे, गाैरव चव्हाण, अर्षद शेख, अंकित जंजाळ, दीपक राऊत, कुंदन लहाने, विशाल शिराेडकर आदी उपस्थित हाेते. यावेळी मान्यवारांची भाषणे झाली.
बालविवाहासंबंधी माहिती देण्याचे आवाहन
वाशिम : जिल्ह्यात २०२० या संपूर्ण वर्षात बालविवाह होत असलेल्या ठिकाणाची माहिती मिळाल्यावरून कारवाई करण्यात आली आहे. तथापि, जिल्ह्यात कुठेही बालविवाह होत असल्यास ‘चाइल्ड लाइन’च्या १०९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून नागरिकांनी माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केले आहे.
वाहनांमधून वायुप्रदूषण वाढले
रिठद : शहरातून धावणारे प्रवासी वाहने, ऑटोपैकी अनेक वाहने भंगार झालेली आहेत. या वाहनांमधून निघणाऱ्या काळ्या धुरामुळे वायुप्रदूषण होत आहे. असे असताना कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे.