बार्शीटाकळीत स्टेट बँकेचे एटीएम फोडले; आठ लाख ४८ हजार लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 06:52 PM2017-12-14T18:52:55+5:302017-12-14T18:57:50+5:30
बार्शीटाकळी : येथील स्टेट बँक आवारातील एटीएम फोडून अज्ञात चोरट्यांनी आठ लाख ४८ हजार ३00 रुपये लंपास केल्याची घटना १३ डिसेंबर रोजी मध्यरात्री घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बार्शीटाकळी : येथील स्टेट बँक आवारातील एटीएम फोडून अज्ञात चोरट्यांनी आठ लाख ४८ हजार ३00 रुपये लंपास केल्याची घटना १३ डिसेंबर रोजी मध्यरात्री घडली.
बुधवार, १३ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान लॉजी कंपनीचे मंगेश चौधरी व पुरुषोत्तम वाघमारे या कर्मचार्यांनी १0 लाख रुपये नगदी बार्शीटाकळी येथील स्टेट बँक आवारातील एटीएममध्ये टाकले होते. रात्रीच्या दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम फोडले. गुरुवारी सकाळी हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले.
माहिती प्राप्त होताच पोलीस घटनास्थळी गेले व तेथील आजूबाजूचे सीसी कॅमेरे तपासले. बँकेच्या संगणाकाद्वारे किती नगदी रक्कम ग्राहकांनी काढली व अज्ञात चोरट्यांनी किती नगदी रक्कम पळविली, याची तपासणी केली असता एटीएममधून ८ लाख ४८ हजार ३00 रुपये नगदी रक्कम लंपास केल्याचे निदर्शनास आले. राहुल वासुदेव गवले यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात इसमांवर भादंवि ४५७, ३६0 व ३४ नुसार गुन्हा दाखल केला. ठाणेदार राहुल धस यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अंबादास खांडवाये पुढील तपास करीत आहेत.