खारपानपट्ट्यात दरवळतोय ओव्याचा सुगंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2017 08:13 PM2017-01-05T20:13:16+5:302017-01-05T20:16:34+5:30

 अतुल जयस्वाल/ऑनलाइन लोकमत  अकोला, दि. 5 - नवनवीन प्रयोग करणाऱ्या खारपानपट्ट्यातील शेतकऱ्यांचा कल आता प्रमुख मसाला पिक असलेल्या ओव्याची ...

Scent-flavored aroma | खारपानपट्ट्यात दरवळतोय ओव्याचा सुगंध

खारपानपट्ट्यात दरवळतोय ओव्याचा सुगंध

Next
 अतुल जयस्वाल/ऑनलाइन लोकमत 
अकोला, दि. 5 - नवनवीन प्रयोग करणाऱ्या खारपानपट्ट्यातील शेतकऱ्यांचा कल आता प्रमुख मसाला पिक असलेल्या ओव्याची शेती करण्याकडे वाढला आहे. कोरडवाहू जमीनीत हमखास येणारा ओव्याला शेतकºयांची पसंती मिळत असून, यंदा जिल्ह्यात शेकडो एकरावर ओवा बहरला आहे. सध्या हे पिक काढणीला आले असून, खारपानपट्ट्यातील शेतशिवारात ओव्याचा सुगंध दरवळतो आहे.
ओवा हे प्रमुख मसाला पिक आहे. राजस्थान, गुजरात या राज्यांमध्ये ओव्याची मोठ्या प्रमानावर शेती केल्या जाते. गत काही वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकºयांनीही मोठ्या प्रमाणात ओवा पेरण्यास प्रारंभ केला आहे. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात शेकडो एकरावर ओव्याची पेरणी करण्यात आली. सुरवातीला राज्य सरकारकडून ओव्या पिकाला प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी १० हजार रुपयांची अनुदान देण्यात आले. त्यानंतर हे अनुदान दोन हजारांवर आले. परंतु, गत काही वर्षांपासून शासनाने हे अनुदान बंद केले आहे. त्यानंतरही शेतकरी मोठ्या प्रमाणात ओव्याची पेरणी करतात. ओवा हे  ६ महिन्यांचे पिक असून, एकरी ५ ते ६ क्विंटलपर्यंत उतारा येतो. ओव्याला प्रती क्विंटल १६ ते १८ हजार रुपयांपर्यंतचा भाव मिळत असल्याने ओवा पिक शेतकºयांसाठी फायद्याचे ठरत आहे. जिल्ह्यातील अकोला, आकोट, तेल्हारा तालुक्यात ओव्याची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. (प्रतिनिधी)
निश्चित बाजारपेठ नाही
ओवा पिकाला चांगला भाव मिळत असून, खारपाणपट्ट्यात त्याचे उत्पन्नही चांगले होते. त्यामुळे शेतकºयांमध्ये हे पिक लोकप्रिय होत आहे. परंतु, या पिकाला जिल्ह्यात निश्चित बाजारपेठ नाही. राजस्थान, गुजरात येथून काही व्यापारी हा माल खरेदी करण्यासाठी येतात. निश्चित बाजारपेठ नसल्याने शेतकºयांना माल विकण्यात अडचण येते.

https://www.dailymotion.com/video/x844ndc

Web Title: Scent-flavored aroma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.