अकोला जिल्हा परिषदेच्या शाळा : सौर पॅनलसाठी अखेर ‘डीपीसी’तून निधीचा प्रस्ताव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 08:39 PM2017-12-21T20:39:41+5:302017-12-21T20:43:14+5:30
अकोला : जिल्हा परिषदेच्या सात माध्यमिक शाळांमध्ये सौर विद्युतसाठी ३५ लाखांची तरतूद असताना, निधीच्या पुनर्विनियोजनात वाढ करून १ कोटी २0 लाख रुपये करण्यात आली. शिक्षण समितीच्या या ठरावाला मंजुरी न मिळाल्याने आता त्या सौर पॅनलसाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी मिळण्याचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हा परिषदेच्या सात माध्यमिक शाळांमध्ये सौर विद्युतसाठी ३५ लाखांची तरतूद असताना, निधीच्या पुनर्विनियोजनात वाढ करून १ कोटी २0 लाख रुपये करण्यात आली. शिक्षण समितीच्या या ठरावाला मंजुरी न मिळाल्याने आता त्या सौर पॅनलसाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी मिळण्याचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. त्यासाठीचा ठराव गुरुवारी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. सभापती पुंडलिकराव अरबट यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
सात माध्यमिक शाळांमध्ये सौर दिव्यांचा उजेड पाडण्यासाठी ९१७ शाळा वंचित राहणार आहेत. त्यामुळे या निर्णयाला भारिप-बमसंने विरोधाची भूमिका घेतली. सर्वसाधारण सभेत त्या निर्णयावर चर्चा व निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला. त्यामुळे हा निधी मिळण्याची शक्यता धूसर झाली. आता त्या शाळांमध्ये सौर पॅनल बसविण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठविण्याचा ठराव घेण्यात आला. त्यासोबतच शाळा दुरुस्तीची यादी मंजूर करणे, शाळांमध्ये वॉटर प्युरिफायर बसविणे, संगणक पुरवठय़ासाठी शाळांची नावे निश्चित करणे, डेस्क-बेंच पुरवठय़ासाठी शाळांची नावे निश्चित करणे, बिंदूनामावली अद्ययावत करण्याचा आढावा घेण्यात आला. कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करून विद्यार्थी व शिक्षकांचे समायोजन करणे, पंचायत समिती अंतर्गत शिक्षण विभागातील तीन वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचार्यांची आस्थापना बदलणे, तालुका स्तरावर क्रीडा स्पर्धा घेण्याच्या ठरावालाही मान्यता देण्यात आली. यावेळी सदस्य प्रतिभा अवचार, मनोहर हरणे यांच्यासह शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर उपस्थित होते.