शालेय पुस्तकं आता ई-बुक्सच्या रूपात!

By admin | Published: December 5, 2014 11:44 PM2014-12-05T23:44:31+5:302014-12-05T23:44:31+5:30

केंद्र शासनाची योजना.

School books now e-books! | शालेय पुस्तकं आता ई-बुक्सच्या रूपात!

शालेय पुस्तकं आता ई-बुक्सच्या रूपात!

Next

अकोला : आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत केंद्र शासन शालेय पुस्तकांना आता ई-बुक्समध्ये रुपांतरित करणार आहे. शासनाने या प्रकल्पाला ह्यई-बस्ताह्ण असे नाव दिले आहे. ई-बुक्स तयार करण्याची जबाबदारी सीडॅककडे देण्यात आली असून, महिनाभरात ही ई-बुक्स ऑनलाईन उपलब्ध होतील.
मोदी सरकारने ई-तंत्रज्ञानाला महत्त्व दिले आहे. सोशल मिडीयाचा अधिकाधिक वापर करण्यावर या शासनाचा भर आहे. विद्यार्थ्यांनादेखील ई-तंत्रज्ञानाशी जुळता यावे, यासाठी केंद्र शासनाने प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शालेय अभ्यासक्रमाची पुस्तके ई-बुक्सच्या स्वरुपात उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने योजना तयार केली आहे. हा उपक्रम डिजीटल इंडिया मोहिमेअंतर्गत हाती घेण्यात आला आहे. यात बायोमेट्रीक हजेरी आणि ई-ग्रिटींगसारख्या कार्यक्रमाचादेखील समावेश आहे.
केंद्र शासनाने ऑगस्ट महिन्यातच डिजीटल इंडिया प्रकल्पाच्या ब्ल्यूप्रिंटला मंजुरी दिली आहे. त्यासाठी पुढील तीन वर्षात एक लाख कोटींची गुंतवणुक करण्यात येणार आहे. शिक्षण विभागाला ई-बुक्ससाठी शालेय अभ्यासक्रमाच्या पुस्तकांची यादी आणि प्राधान्यक्रम ठरविण्याची सूचना करण्यात आली आहे. एनसीईआरटीसोबत समन्वय साधून ही यादी तयार करण्यात येणार आहे. सध्या काही खासगी संस्था एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमावर आधारित ई-बुक्स तयार करण्याचे काम करीत आहेत; परंतु हे काम वेगवेगळ्या आघाड्यांवर विस्कळीत झाले आहे. म्हणूनच केंद्र शासनाने ई-बुक्ससाठी सेंटर फॉर डेव्हलपमेंट अँडव्हान्स कॉम्प्युटरींग (सीडॅक) या संस्थेला एकच प्लॅटफार्म तयार करण्याची जबाबदारी दिली आहे.

Web Title: School books now e-books!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.