स्कूल बस चालकांना १४ महिन्यांपासून नाही काम; काही जण विकतात भाजीपाला, तर काही करतात मजुरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:20 AM2021-05-20T04:20:22+5:302021-05-20T04:20:22+5:30
--बॉक्स-- मुले दररोज स्कूल बसने प्रवास करायचे ९८०० जिल्ह्यातील एकूण बस, ऑटो ३४५ जिल्ह्यातील एकूण चालक ४८५ --बॉक्स-- स्कूल ...
--बॉक्स--
मुले दररोज स्कूल बसने प्रवास करायचे ९८००
जिल्ह्यातील एकूण बस, ऑटो ३४५
जिल्ह्यातील एकूण चालक ४८५
--बॉक्स--
स्कूल बसची चाके थांबल्याने दर महिन्याला मिळणारा पगारही थांबला आहे. गावाकडे गवंडी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे. स्कूल बस केव्हा सुरू होतील, याकडे लक्ष लागले आहे. सरकारने एखादे पॅकेज जाहीर करून स्कूल बस चालक, मालकांना दिलासा देणे अपेक्षित आहे.
- सुधाकर ओढे, स्कूल बस चालक
--बॉक्स--
१४ महिन्यांपासून कोरोनामुळे स्कूल बस बंद आहेत. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. काही दिवस ऊसनवारी करून उदरनिर्वाह केला. मिळेल ते काम करण्याची वेळ आली आहे. सरकारने एखादे पॅकेज जाहीर करून स्कूल बस चालक, मालकांना दिलासा द्यायला हवा.
- विजय भाले, स्कूल बस चालक
--बॉक्स--
स्कूल बस बंद असल्याने आर्थिक पेच निर्माण झाला. त्यातच बसचे हप्ते थकले आहेत. काही दिवस ट्रॅक्टर चालक म्हणून काम केले. पण, तेही आता बंद आहे. सध्या काही काम नसल्याने घरखर्च चालविणे कठीण झाले आहे. उधारी किराणा घेऊन उदरनिर्वाह सुरू आहे.
- अनिल सरोदे, स्कूल बस चालक