शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:25 AM2020-12-30T04:25:37+5:302020-12-30T04:25:37+5:30
अकाेट : श्रीमती लक्ष्मीबाई गणगणे विद्यालयात अकोट पंचायत समिती शिक्षण विभाग, तालुका मुख्याध्यापक संघ व तालुका विज्ञान अध्यापक मंडळ ...
अकाेट : श्रीमती लक्ष्मीबाई गणगणे विद्यालयात अकोट पंचायत समिती शिक्षण विभाग, तालुका मुख्याध्यापक संघ व तालुका विज्ञान अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सभा मंगळवारी पार पडली.
अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी विजय हाडोळे हाेते. यावेळी नायब तहसीलदार हरिष गुरव यांच्या मार्गदर्शनात तालुक्यातील मुख्याध्यापक व विज्ञान शिक्षकांची सभा झाली. सभेला जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र भास्कर, मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष मोहन खाडे, प्राचार्य विलास रोडे व जिल्हा विज्ञान मंडळाचे विश्वास जढाळ यांची प्रमुख उपस्थिती हाेती.
सभेत हरिष गुरव, विजय हाडोळे, डॉ. रवींद्र भास्कर यांनी एनएमएमएस परीक्षेबद्दल मार्गदर्शन केले. सभेचे प्रास्ताविक मनीष निखाडे यांनी केले. सूत्रसंचालन सुरेखा माकोडे व उज्ज्वला तायडे यांनी केले. आभार प्रदर्शन गजानन चव्हाण यांनी केले. सभेला गट साधन केंद्राचे तृप्ती बिजवे, चंद्रशेखर तेलगोटे, सुनील मस्करे, धन्दर, सर्व केंद्रप्रमुख, सर्व विषय साधन व्यक्ती तसेच विज्ञान अध्यापक मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या सभेला जवळपास २०० मुख्याध्यापक व मार्गदर्शक शिक्षक उपस्थित होते.